IPL 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्सकडून खेळणार? यशस्वी जयस्वालची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री!

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी बराच अवधी शिल्लक आहे. असं असताना फ्रेंचायझींनी पुढच्या पर्वासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दोन मोठे खेळाडू ट्रेड करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे.

IPL 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्सकडून खेळणार? यशस्वी जयस्वालची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री!
IPL 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्सकडून खेळणार? यशस्वी जयस्वालची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री!
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 19, 2026 | 10:51 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याची कामगिरी निराशाजनक राहिली. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आणि 8 गुणांसह नवव्या स्थानावर राहिला. या निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला रिलीज करण्याची शक्यता वाढली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यासाठी मुंबई इंडियन्सची राजस्थान रॉयल्ससोबत चर्चा सुरू आहे. हार्दिक पांड्याऐवजी यशस्वी जयस्वालला संघात घेण्याचे मुंबई इंडियन्सचे प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आयपीएल 2027 स्पर्धेत यशस्वी जयस्वाल मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. पण आता फ्रेंचायझीपासून वेगळा होण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या नव्या संघाच्या शोधात?

मुंबई इंडियन्सचं आयपीएलच्या सलग तीन पर्वात कर्णधारपद भूषवल्यानंतर हार्दिक पांड्या काही खास करू शकला नाही. मुंबई इंडियन्सची स्थिती उलट या काळात अधिक खालावली. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता मुंबई इंडियन्स त्याला रिलीज करेल किंवा हार्दिक पांड्या सोडेल, या चर्चांना आयपीएल 2026 दरम्यान उधाण आलं होतं. दुसरीकडे, हार्दिक पांड्याला मुंबई संघाकडून हवी तशी मिळत नाही, अशा चर्चाही रंगल्या आहेत. म्हणजेच काही वरिष्ठ खेळाडू हार्दिकला साथ देत नाही असा त्यातून अर्थ निघतो. त्यामुळे हार्दिक पांड्याने संघापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

यशस्वी जयस्वाल राजस्थान का सोडणार?

यशस्वी जयस्वालचं कारण थोडं वेगळं असल्याचं दिसत आहे. राजस्थान रॉयल्स संघात यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीची तुलना होताना दिसत आहे. दोघंही डावखुरे आहेत. पण वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 स्पर्धेत सर्व क्रेडिट घेऊन गेला. त्यामुळे यशस्वी जयस्वालने दुसऱ्या संघात जावं, अशी चर्चा आयपीएल स्पर्धेदरम्यान चर्चा रंगली होती. अंबाती रायुडू याने ईएसपीएन क्रिकइंफोच्या कार्यक्रमात, यशस्वी जयस्वालला टीम सोडण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ही चर्चा अधिक जोर धरत आहे. दुसरीकडे, रियान परागच्या गैरहजेरीत यशस्वी जयस्वालने कर्णधारपदही भूषवलं होतं. पण आता मुंबई इंडियन्समध्ये खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. अंबाती रायुडूच्या मते, यशस्वी जयस्वालसाठी मुंबई इंडियन्स हा संघ योग्य ठरू शकेल. पण आता तसं काही होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Follow Us