AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2027: ऋषभ पंत लखनौ आणि कुलदीप यादव दिल्लीची साथ सोडणार, या संघाकडून खेळणार

आयपीएल 2026 स्पर्धा नुकतीच संपली असून आता पुढच्या पर्वासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांनी आपआपला आयपीएल संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्स, तर कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्स संघात आहेत.

IPL 2027: ऋषभ पंत लखनौ आणि कुलदीप यादव दिल्लीची साथ सोडणार, या संघाकडून खेळणार
IPL 2027: ऋषभ पंत लखनौ आणि कुलदीप यादव दिल्लीची साथ सोडणार, या संघाकडून खेळणारImage Credit source: PTI
| Updated on: Jun 19, 2026 | 5:55 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने सुमार कामगिरी केली. या पर्वातही दोन्ही संघांचं जेतेपदाचं स्वप्न साखळी फेरीच्या काही सामन्यातच संपुष्टात आलं. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी एकदम खराब झाली. त्यामुळे पुढच्या पर्वात संघात बदल होणार हे निश्चित होतं. त्यात ऋषभ पंत कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. त्यात लखनौ सुपर जायंट्स त्याला एका पर्वासाठी 27 कोटी रुपये देते. त्यात त्याची कामगिरी काही खास नाही. त्यामुळे फ्रेंचायझी त्याला रिलीज करण्याची शक्यता वाढली आहे. तर कुलदीप यादवही दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडणार असल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार, कुलदीप यादव आयपीएल 2027 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स ऐवजी लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळणआर आहे. तर ऋषभ पंतचं दिल्ली कॅपिटल्स संघात पुनरागमन होऊ शकते.

ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्स सोडणार कारण…

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठी बोली लावून संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतला संघात घेतलं होतं. लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यासाठी 27 कोटींची विक्रमी बोली लावली होती. ऋषभ पंतची संघात एन्ट्री झाल्यानंतर संजीव गोयंका यांनी दावा केला होता की, हा खेळाडू पुढच्या 10 वर्षात अनेकदा आयपीएल जिंकणार. पण आता त्याला दोन वर्षात संघातून डच्चू देण्याची शक्यता वाढली आहे. ऋषभ पंतने आयपीएल 2025 स्पर्धेत 269 धावा, तर 2026 मध्ये फक्त 312 धावा केल्या होत्या.

कुलदीप यादव दुसरा पर्याय शोधणार?

कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्स सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण असं खरंच आहे का आणि का ते स्पष्ट नाही. आयपीएल 2026 स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने 12 सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या. तसेच त्याचा इकोनॉमी रेटही 10 धावांपेक्षा अधिक प्रति षटक होता. कुलदीप यादवला दिल्लीने 13.25 कोटी रिटेन केलं होतं. दिल्ली कॅपिटल्ससोबत 2022 पासून आहे. पण आता दुसऱ्या संघात खेळण्याची इच्छा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात खेळाडूंची देवाणघेवाण होताना दिसतील.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी