
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचा हायव्होल्टेज सामना भारताने 61 धावांनी जिंकला. भारताने या सामन्यात पाकिस्तानचं कुठेच वजन वाढू दिलं आहे. नाणेफेकीचा कौल गमावणे आणि पहिल्या षटकातील विकेट सोडता भारतीय संघाने हा सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्या फलंदाजीत काही योगदान देऊ शकला नाही. पण गोलंदाजीत त्याने कमाल केली. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव निश्चित झाला. असं असताना हार्दिक पांड्याची एक कृती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावेळी त्याची कृती भारतीयांचं मन जिंकत आहे. त्यामुळे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावेळी दोन्ही हातांची घडी घातली होती.
भारत पाकिस्तान सामना तटस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेच्या कोलंबोत झाला. या सामन्यात नाणेफेक पाकिस्तानने जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फिरकीवर भारतीय संघाला गुंडाळू असा फाजील विश्वास त्यांना होता. त्याचे परिणाम काय झाले ते दिसून आलं. नाणेफेकीनंतर दोन्ही संघाचे खेळाडू नाणेफेकीनंतर मैदानात राष्ट्रगीतासाठी आले. जेव्हा पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजलं तेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू सावधान मुद्रेत उभे होते. पाकिस्तानी खेळाडू त्यांचं राष्ट्रगीत गातही होते. तर भारतीय खेळाडू सावधान मुद्रेत स्तब्ध उभे होते. पण हार्दिक पांड्या हाताची घडी घालून उभा होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Hardik pandya didn’t give a f*** to the Pakistan national anthem.🤓#INDvPAK #AsiaCup2025 pic.twitter.com/Psy7DNmvvn
— God-Say (@Godse_Official) September 21, 2025
हार्दिक पांड्याने साहिबजादा फरहान विकेटही चर्चेत राहिली आहे. त्याचं कारण असं की हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात शून्यावर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पण या दरम्यान त्याने झेल कसा घेतला हे देखील पाहिलं नाही. साहिबजादाला रागाने पाहातच होता. त्यामुळे या विकेटची चर्चाही रंगली आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 175 धावांची खेळी केली. यात इशान किशनची 77 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. अभिषेक शर्माची विकेट पडल्यानंतरही त्याने आक्रमक बाणा कायम ठेवला होता. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अडचणीत आला. भारताने पाकिस्तानला 114 धावांवर रोखलं आणि हा सामना 61 धावांनी जिंकला.