इंग्लंडमध्ये हरमनप्रीतची कमाल, 26 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला

| Updated on: Sep 21, 2022 | 11:33 PM

टीम इंडियानं पाच विकेट गमावून 333 धावा बनवल्या आहेत. विशेष हा इंग्लंडच्या भूमिवर सगळ्यात मोठा स्कोर आहे.

इंग्लंडमध्ये हरमनप्रीतची कमाल, 26 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला
हरमनप्रीत कौरची दमदार कामगिरी
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये (England) भारतीय महिला क्रिकेट टीमनं (Indian womens cricket team) धमाकेदार कामगिरी करत अवघ्या जगाचं लक्ष वेधलंय. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) 143 धावांची चांगलीच खेळी खेळली आहे. टीम इंडियानं पाच विकेट गमावून 333 धावा बनवल्या आहेत. विशेष हा इंग्लंडच्या भूमिवर सगळ्यात मोठा स्कोर आहे. हरमनप्रीत आणि टीम इंडियानं दमदार कामगिरी करत रेकॉर्ड तोडला आहे.

जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

  1. भारतानं 50 षटकात 333 धावा केल्या. टीम इंडियानं वनडे क्रिकेटमध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही चौथी वेळ आहे. त्यापैकी यंदा दोनदा हा चमत्कार घडला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या विश्वचषकात तिनं 317 धावा केल्या होत्या.
  2. ही भारताची इंग्लंडविरुद्धची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. एवढेच नाही तर इंग्लंडमध्ये भारताची ही सर्वात मोठी वनडे धावसंख्या आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या 281 धावांची होती. ही केवळ 2017 मध्ये इंग्लंडमध्ये आली होती.
  3. हरमनप्रीतनं त्याच्या वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावलंय. कर्णधार म्हणून हे तिचं दुसरे, तर पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिलं एकदिवसीय शतक आहे.
  4. हरमनप्रीतनं नाबाद 143 धावांची खेळी करत इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमधील सर्वोच्च धावसंख्येचा 26 वर्ष जुना विक्रम मोडलाय. त्याच्या आधी 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डॅबी हॉकलीनं 117 धावा केल्या होत्या.
  5. हरमनप्रीत कौरची 143 धावांची धावसंख्या ही इंग्लंडविरुद्धच्या कोणत्याही फलंदाजानं केलेली तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. हा विक्रम ऑस्ट्रेलियन दिग्गज अ‍ॅलिसा हिलीच्या नावावर आहे.
  6. दीप्ती शर्मासह हरमनप्रीत कौरनं अवघ्या 24 चेंडूत नाबाद 71 धावांची भागीदारी केली. म्हणजेच दोघांनी 17.75 धावा प्रति षटक या दरानं धावा केल्या. हे महिलांच्या एकदिवसीय सामन्यात 50 पेक्षा जास्त धावांच्या भागीदारीसाठी सर्वात वेगवान धावसंख्या आहे.
    हरमनप्रीत कौर ही इंग्लंडविरुद्ध एकापेक्षा जास्त शतक झळकावणारी पहिली भारतीय फलंदाज आहे. याआधी तिनं 2013 मध्ये मुंबईत 107 धावा केल्या होत्या, हे तिचं पहिलं एकदिवसीय शतक होते.