AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर लाजिरवाणी बाब…! द हंड्रेड स्पर्धेच्या लिलावापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंबाबत हॅरी ब्रूकचं मोठं विधान

The Hundred 2026: इंग्लंडमधील द हंड्रेड लीग स्पर्धेच्या पुढच्या पर्वासाटी 11 आणि 12 मार्च रोजी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. पण काही फ्रेंचायझी खेळाडूंची निवड करताना हात आखुडता घेत असल्याचं दिसून आलं आहे. यावर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने मोठं विधान केलं आहे.

ही तर लाजिरवाणी बाब...! द हंड्रेड स्पर्धेच्या लिलावापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंबाबत हॅरी ब्रूकचं मोठं विधान
ही तर लाजिरवाणी बाब...! द हंड्रेड स्पर्धेच्या लिलावापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंबाबत हॅरी ब्रूकचं मोठं विधानImage Credit source: PTI
| Updated on: Feb 21, 2026 | 4:41 PM
Share

The Hundred 2026: इंग्लंडमधील द हंड्रेड लीग स्पर्धा एक प्रतिष्ठीत स्पर्धा असून 100 चेंडूंचा सामना असतो. टी20 लीगच्या तुलनेत या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात 120 नाही तर 100 चेंडू टाकले जातात. या स्पर्धेचं पुढचं पर्व 21 जुलैपासून सुरू होणार असून 16 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेसाठी 11 आणि 12 मार्च रोजी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या स्पर्धेसाठीचा लिलाव यंदा खास असणार आहे. कारण आयपीएल स्पर्धेशी निगडीत भारतीय ग्रुप्स या स्पर्धेत भाग घेणार आहेत. तसेच खेळाडूंसाठी बोली लावणार आहे. द हंड्रेड लीग स्पर्धेतील चार संघांचा मालकी भारतीय फ्रेंचायझींकडे असणार आहे. या फ्रेंचायझी आयपीएलशी निगडीत आहेत. असं असताना लिलावापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंचे धाबे दणाणले असून इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने त्याबाबत आपलं मत मांडलं आहे.

द हंड्रेडमध्ये मॅन्चेस्टर सुपर जायंट्स, एमआय लंडन, साउदर्न ब्रेव आणि सनरायझर्स लीड्स या चार संघांचा मालकी हक्क भारतीय गटाकडे आहे. त्यामुळे या फ्रेंचायझी पाकिस्तान खेळाडू निवडणार नसल्याची शंका आहे. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यात टोकाचे वाद आहेत. त्याचे पडसाद क्रिकेटच्या मैदानात दिसून आले आहेत. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे. इतकंच काय तर एसए20 आणि आयएलटी20 लीग स्पर्धेतही भारतीय मालकी हक्क असलेल्या फ्रेंचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंना संघातून वगळलं आहे.

हॅरी ब्रूक काय म्हणाला?

द हंड्रेड लीग स्पर्धेतील पाकिस्तानी खेळाडूंची स्थिती पाहता टी20 आणि वनडे कर्णधार हॅरी ब्रूकने आपलं मत जाहीर केलं आहे. हॅरी ब्रूकने स्पष्ट सांगितलं की, जर पाकिस्तानी क्रिकेटपटूंना द हंड्रेड स्पर्धेतून बाहेर केलं तर हे खूपच वाईट असेल. हॅरी ब्रूकने सांगितलं की, ‘मी असं म्हणेन की पाकिस्तान कित्येक वर्षांपासून एक महान क्रिकेट देश आहे. मला वाटतं की लिलावत जवळपास 50 ते 60 पाकिस्तानी खेळाडू आहेत. त्यांच्या या स्पर्धेत काही जणं नसणं ही लाजिरवाणी गोष्ट असेल. तिथे काही चांगले क्रिकेटपटू आहे. त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकवर्गही येतो.’

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा