AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Captain : वनडे-टी 20i टीमच्या कर्णधारपदी या खेळाडूची नियुक्ती, आयपीएलदरम्यान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

Odi And T20i Captain : क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट बोर्डाने नव्या टी 20iआणि एकदिवसीय संघाच्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे.

Captain : वनडे-टी 20i टीमच्या कर्णधारपदी या खेळाडूची नियुक्ती, आयपीएलदरम्यान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
Harry Brook and Sanju SamsonImage Credit source: AP
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 07, 2025 | 5:53 PM
Share

भारतात सध्या आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफसाठी चुरस पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय आणि टी 20i संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. इंग्लंडने हॅरी ब्रूक याची टी 20i आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. हॅरी ब्रूक याची जोस बटलरच्या जागी वर्णी लागली आहे. बटलरने काही दिवसांपूर्वीच कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. इंग्लंड क्रिकेट आणि आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेदरम्यान जोस बटलर याने इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. इंग्लंडला बटलरच्या नेतृत्वात या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. इंग्लंडचं आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्ठात आलं होतं. याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत बटलरने 28 फेब्रुवारीला कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून इंग्लंडच्या कर्णधारपदी कुणाची नियुक्ती होणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष होतं. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. आता हॅरी इंग्लंडचा नवा व्हाईट बॉल कॅप्टन असणार आहे.

इंग्लंडची चॅम्पियन्स ट्रॉफीत पराभवाची हॅटट्रिक

दरम्यान इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे इंग्लंडचा साखळी फेरीतूनच बाजार उठला होता. इंग्लंडने साखळी फेरीत खेळलेले तिन्ही सामने गमावले. इंग्लंडला ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने पराभूत केलं होतं. इंग्लंडला या स्पर्धेत लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आता हॅरी ब्रूकसमोर इंग्लंडला आपल्या नेतृत्वात गतवैभव प्राप्त करुन देण्याचं आव्हान असणार आहे.

हॅरी ब्रूक इंग्लंडचा नवा कर्णधार

हॅरी ब्रूकची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

दरम्यान हॅरी ब्रूक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारच नवखा नाही. हॅरीने इंग्लंडचं 24 कसोटी, 26 एकदिवसीय आणि 44 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. हॅरीने टेस्ट, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 2281, 816 आणि 798 अशा धावा केल्या आहेत. तसेच हॅरीने आयपीएलमध्ये 11 सामने खेळले आहेत. हॅरीने आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी ऐनवेळेस स्पर्धेतून माघार घेतली. हॅरीची ही माघार घेण्याची सलग दुसरी वेळ ठरली. त्यामुळे बीसीसीआयने हॅरी याच्यावर बंदी घातली आहे. हॅरीला दिल्ली कॅपिट्ल्सने आपल्या टीममध्ये घेतलं होतं.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...