
भारताने न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिका 1-2 ने गमावली. या मालिकेतील तिसर्या सामन्यात भारताने विजयासाठी कडवी झुंज दिली. पण पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने विराट कोहलीने हर्षित राणासोबत सातव्या विकेटसाठी 69 चेंडूत 99 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने 124 धावा केल्या. तर आठव्या क्रमांकावर उतरत हर्षित राणाने 52 धावांची खेळी केली. मात्र 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 297 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना 41 धावांनी गमावला. असं असताना विराट कोहली आणि हर्षित राणाच्या भागीदारीची चर्चा होत आहे. दुसरीकडे, अष्टपैलू हर्षित राणाने विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्काबाबत एक मजेशीर किस्सा शेअर केला होता. एका मुलाखतीत हर्षित राणाने हा किस्सा सर्वांना सांगितला होता. तेव्हा नेमकं काय झालं होतं ते जाणून घ्या.
हर्षित राणाने सांगितलं की, पहिल्यांदा अनुष्का शर्माला भेटला तेव्हा मी त्यांना मॅम असं संबोधलं. तेव्हा विराट कोहलीने त्याला अडवलं आणि अनुष्काला वहिनी बोल असं सांगितलं. हर्षित राणाने सांगितलं की, ‘मी पहिल्यांदा अनुष्काला भेटलो होतो. तेव्हा मी सहज त्यांना मॅम असं बोललो. तेव्हा विराट कोहलीने सांगितलं की मॅम नको बोलूस. वहिनी बोल. मी सांगितल की मी त्यांना पहिल्यांदाच भेटलो आहे. तेव्हा विराटने मजेशीर अंदाजात सांगितलं की, हा बाहेर माझ्यावर शँपेन फेकत होता. आता तुला मॅम बोलत आहे.’
After the CT win, when Anushka bhabhi came into the dressing room & Harshit met her for the first time, he called her ma’am. Virat instantly told him, tu mam kyun bol rha inko, bhabhi bol 😂🙏
Then he told Anushka – ye aisa hi h, abhi bahar mere upar champagne spray kar raha… pic.twitter.com/i3OihtHnGP
— Kohlistic🔥 (@Kohlistic18) January 18, 2026
टीम इंडियात सामील होण्यापूर्वी विराट कोहली आणि हार्दिक पांड्याबाबत गैरसमज होता. पण संघात सहभागी झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद झाला आणि माझे सर्व गैरसमज दूर झाले. हर्षित राणा म्हणाला की, ‘टीव्हीवर पाहताना मला वाटायचं की विराट कोहली आणि हार्दिक पांड्या आक्रमक स्वभावाचे आहेत. ते सर्वांना घाबरवत असतील. पण हा एक गैरसमज होता. जेव्हा त्यांना प्रत्यक्षात भेटलो तेव्हा ते मजेदार होते. त्यामुळे मी काय विचार करत होतो त्यापेक्षा वेगळे निघाले.’