
दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताला धोबीपछाड दिल्यानंतर वनडेतही जेरीस आणलं होतं. पहिल्या वनडे सामन्यात भारताना 17 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या वनडे सामन्यात 358 धावा करूनही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. खरं तर भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि भारताने अर्धा सामना तिथेच जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच दक्षिण अफ्रिकेला 270 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर हे आव्हान भारताने 1 गडी गमवून 39.5 षटकात पूर्ण केलं. यासह तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-1 ने जिंकली. या विजयानंतर नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा ठरल्याचं कर्णधार केएल राहुलने सांगितलं. इतकंच 20 सामन्यानंतर भारताने नाणेफेक जिंकल्याने केएल राहुलने आनंदही व्यक्त केला. असं असताना दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने पराभवाचं कारण सांगितलं.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, ‘आजचा सामना आम्हाला खूप रोमांचक करायचा होता. पण फलंदाजीच्या दृष्टिकोनातून, आमच्याकडे पुरेसे धावा नव्हत्या. प्रकाशात खेळणे सोपे होते. आम्ही विकेट पडत असताना आम्ही कदाचित हुशार असायला हवे होते. भारतीय संघाने त्यांची गुणवत्ता दाखवली. याबाबत त्यांचे कौतुक. जर तुम्ही पहिले दोन एकदिवसीय सामने पाहिले तर आम्ही ते केले. त्यामुळे या सामन्यात आम्ही खूप हुशार असू शकलो असतो. कदाचित आज परिस्थिती वेगळी होती. 50 षटकांच्या सामन्यात तुम्हाला कधीही सर्वबाद व्हायचे नसते. काही चांगल्या सुरुवातींपैकी क्विंटनने 100 धावा काढल्या आणि मीही तो केल्या पण त्यात तेवढं यश मिळालं नाही.’
‘आम्ही निश्चितच खूप काही शिकलो आहोत. आम्ही कसे खेळायचे याबद्दल बरेच काही बोलतो. भारताकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत आणि त्यांना दबावाखाली आणणे कधीच सोपे नसते. मालिकेतील बऱ्याच भागांसाठी आम्ही ते केले. मला वाटते की जर 10 बॉक्स असतील तर आम्ही त्यापैकी 6 किंवा 7 बॉक्स जिंकले आहेत.’, असंही टेम्बा बावुमा पुढे म्हणाला.