भारतीयांच्या जीवावर अमेरिका खेळतेय क्रिकेट! संघात एन्ट्री कशी होते? संपूर्ण प्रोसेस समजून घ्या

Under 19 World Cup 2026: अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे सुरू आहे. या स्पर्धेत अमेरिकेचा संघही उतरला आहे. पहिलाच सामना भारताविरुद्ध झाला. पण अमेरिकेच्या संघात सर्वच खेळाडू हे भारतीय वंशाचे होते. भारतीय वंशाच्या खेळाडूंचं संघात निवड झाली तरी कशी? जाणून घ्या

भारतीयांच्या जीवावर अमेरिका खेळतेय क्रिकेट! संघात एन्ट्री कशी होते? संपूर्ण प्रोसेस समजून घ्या
भारतीयांच्या जीवावर अमेरिका खेळतेय क्रिकेट! संघात एन्ट्री कशी होते? संपूर्ण प्रोसेस समजून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 16, 2026 | 7:55 PM

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिलाच सामना भारत आणि अमेरिका यांच्यात पार पडला. हा सामना भारताने सहज जिंकला. पण अमेरिकेचा संघ पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण या संघाची प्लेइंग 11 पाहता समोर भारतीय खेळाडू आहेत असा प्रश्न पडला. कारण सर्व खेळाडू हे भारतीय वंशाचे होते. अमेरिकासारखा बलाढ्य संघ क्रिकेटमध्ये पुढे जात आहे. पण या संघात एकही अमेरिकेतील मूळ खेळाडू नाही. अमेरिकेचे क्रिकेट भारत, पाकिस्तान आणि कॅरेबियन वंशाच्या प्रवाशांवर टिकून आहे. चला जाणून घेऊयात भारतीय वंशाच्या खेळाडूंचं अमेरिकन क्रिकेट संघात कशी निवड होते? काय आहे नियम? आणि एंट्रीनंतर किती पगार मिळतो ते…

अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात भारतीय वंशाचे सर्वाधिक खेळाडू आहे. अमेरिकेत 40 ते 50 लाख भारतीय वंशाचे लोकं राहतात. यामुळे अमेरिकन क्रिकेट संघात संख्या वाढलेली दिसत आहे. अमेरिकेत क्रिकेट फार काही लोकप्रिय नाही. कारण तिथल्या लोकांना बेसबॉल, एनबीए, अमेरिकन फुटबॉल आवडते. पण अमेरिकेत क्रिकेट भारत-पाकिस्तानच्या वंशाच्या लोकांनी जिवंत ठेवलं आहे. त्यामुळे अमेरिकन क्रिकेटचा पाया हा भारतीय, पाकिस्तानी आणि कॅरेबियन वंशाच्या लोकांवर टिकून आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. अमेरिकेच्या अंडर 19 संघातील 15 खेळाडू हे भारतीय वंशाचे आहेत. याबाबत युएसए क्रिकेटने स्पष्टीकरण देत सांगितलं की, निवड ही त्यांच्या कामगिरीवर केली गेली आहे. त्यांची पार्श्वभूमी पाहून निवड केलेली नाही.

अमेरिकन संघात भारतीय वंशाच्या खेळाडूंची निवड कशी होते?

आयसीसी नियमानुसार युएसए संघात खेळण्यासाठी खेळाडूंना काही अटी आणि शर्थी पूर्ण कराव्या लागतात.

  • खेळाडूचा जन्म अमेरिकेत झालेला असावा.
  • खेळाडूकडे अमेरिकेचं नागरिकत्व असावं.
  • खेळाडू कमीत कमी तीन वर्षे अमेरिकेत राहत असावा.
  • खेळाडू मागच्या 5 वर्षात 3 पर्वात आपल्या क्लब संघाच्या कमीत कमी 50 टक्के देशांतर्गत लीग सामने खेळला असावा.
  • मागच्या पाच वर्षात त्याने कमीत कमी 100 दिवस अमेरिकेत क्रिकेट कोचिंग, प्लेइंग किंवा एडमिनिस्ट्रेशनमध्ये घालवलेले असावेत.

अमेरिकेत क्रिकेटपटूंना किती मानधन मिळतं?

युएसए क्रिकेटपटूंचं मानधन इतर मोठ्या देशांच्या तुलनेत कमी आहे. पण मेजर लीग क्रिकेटमधून अतिरिक्त कमाई होते. अमेरिकेत खेळाडूंना सेंट्रल करार मिळतो. यात काही खेळाडूंना एका वर्षाचा, तर काही खेळाडूंना तीन महिन्यांचा करार मिळतो. सर्वात कमी पगार हा 12 लाख रूपये, तर सर्वाधिक पगार हा 75 लाखांच्या घरात असतो.