AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: विराट कोहलीच्या शूजची किंमत किती? One8 ब्रँडेड बूट किती महाग? पाकिस्तान क्रिकेटपटूही त्याच्या प्रेमात

Virat Kohli brand One8 shoes: दुबईतील महिला आशिया कपमध्ये पाकिस्तान टीमच्या एक नाही तर अनेक महिला खेळाडू विराट कोहलीचा ब्रँड One8 ks हे शूज घालून खेळताना दिसत आहेत. किती आहे त्यांची किंमत?

Virat Kohli: विराट कोहलीच्या शूजची किंमत किती? One8 ब्रँडेड बूट किती महाग? पाकिस्तान क्रिकेटपटूही त्याच्या प्रेमात
विराट कोहली One8 ब्रँडेड बूटImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 10, 2026 | 1:39 PM
Share

विराट कोहली हा केवळ स्फोटक फलंदाज नाही तर एक स्मार्ट उद्योजकही ठरला आहे. त्याचा शूज ब्रँड One8 ची अजून एक नवीन सीरीज लाँच झाली आहे. त्याला भारतातून मोठा प्रतिसाद मिळाला. पण आता विराटच्या या बुटाच्या ब्रँडची क्रेझ परदेशातही आहे. प्रतिस्पर्धी पाकिस्तानमध्ये सुद्धा या शूजला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. दुबईतील महिला आशिया कपमध्ये पाकिस्तान टीमच्या एक नाही तर अनेक महिला खेळाडू विराट कोहलीचा ब्रँड One8 ks हे शूज घालून खेळताना दिसत आहेत. किती आहे या बुटाची किंमत?

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

महिला आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँग दरम्यान नुकताच सामना झाला. यामध्ये पाकिस्तान महिला खेळाडूंच्या पायातील बुटांकडे सर्वांचे लक्ष गेले. काही बातम्यानुसार, नाशरा संधू, ऐमान फातिमासह अनेक खेळाडूंच्या पायात One8 हा बुट दिसला. त्यामुळे विराट कोहली याच्या शूज ब्रँडची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येते.

नाशरा संधूची दमदार कामगिरी

नाशरा संधू हिच्या One8 या शूजची झलक सोशल मीडियावर दिसली. तिने हाँगकाँगविरोधात कमाल गोलंदाजी केली. नाशरा संधू हिने हाँगकाँगविरोधातील सामन्यात चार षटकात केवळ 7 धावा देऊन 6 गड्यांना बाद केले. तिच्या करिअरमधील ही सर्वात दमदार कामगिरी होती. पाकिस्तानकडून टी-20 क्रिकेटमध्ये सहा विकेट घेणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. नाशरा हिच्या घातक गोलंदाजीपुढे हाँगकाँगचा संपूर्ण संघ केवळ 71 धावांवर तंबूत परतला. पाकिस्तानने हा सामना खिशात घालत उपांत्य फेरीत धडक दिली.

विराट कोहलीच्या बुटाची किंमत किती?

आता व्हायरल छायाचित्रानुसार आणि व्हिडिओनुसार पाकिस्तानी महिला क्रिकेटर्सने Cover Drive 18 Pro हा या ब्रँडचा बुट घातला आहे. One8 च्या साईटनुसार, शूजची भारतीय चलनातील किंमत 13,999 रुपये आहे. हे बुट जर्सी व्हाईट सोनिक ब्लू आणि क्लासिक ब्लॅक या रंगात न्हाऊन निघालेले आहेत. 13,999 रुपयाच्या या बुटाची किंमत पाकिस्तान चलनात 40,954 रुपये इतकी होते. या खेळाडूंनी हे शूज जवळपास 41 हजार पाकिस्तानी रुपये देऊन खरेदी केले असतील.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत