AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ipl 2024 | विराट कोहली लिलावामध्ये उतरला तर त्याला… माजी खेळाडूने सांगितला आकडा

Virat Kohli IPL Prise : आयपीएल लिलाव पार पडला असून अनेका खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. युवा खेळाडूंवरही फ्रंचायसींनी विश्वास दाखवला असून कोट्यवधी रूपयांनी बोली लावली. अशातच जर विराट लिलावामध्ये उतरला तर त्याला किती रूपयांची बोली लागेल याचा आकडा माजी खेळाडूने जाहीर केला आहे.

ipl 2024 | विराट कोहली लिलावामध्ये उतरला तर त्याला... माजी खेळाडूने सांगितला आकडा
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 22, 2023 | 5:43 PM
Share

मुंबई :आयपीएल 2024 चा लिलाव नुकताच पार पडला असून या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मजबूत पैसा जिंकला. कारण यंदाच्या लिलावामध्ये इतिहासातील सर्वात दोन मोठ्या बोली लागल्या. दोन्ही खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचेच होते. ऑस्ट्रेलिया संघाचा पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क हे इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. अशातच याचाच धागा पकडत स्टार माजी खेळाडू आकाश चोप्रा खेळाडू विराट कोहली जर लिलावात उतरला तर त्याला किती रूपयांची बोली लागू शकते जाणून घ्या.

विराट कोहलीला आयपीएल लिलावात किती किंमत लागेल?

आयपीएल लिलावामध्ये अनेक भारतीय खेळाडू असे आहेत जे लिलावामध्ये उतरले तर त्यांना सर्वात मोठी बोली लागू शकते. आकाश चोप्राच्या मते, विराट कोहली जर आयपीएल लिलावामध्ये उतरला तर त्याला मिचेल स्टार्कपेक्षा दुप्पट किंमत मिळू शकते. विराटला जवळपास  42- 45 कोटी रूपयांची बोली लागू शकते, असं आकाश चोप्राने म्हटलं आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत 237 आयपीएल सामने खेळले आहेत. 229 डावांमध्ये विराटने 37.25 च्या सरासरीने 7263 धावा केल्या आहेत. यामध्ये विराट कोहली याने सात शतके आणि 50 अर्धशतके केली आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट स्थानी आहे. या यादीमध्ये शिखर धवन दुसऱ्या स्थानावर असून त्याने 6617 धावा केल्या आहेत.

आयपीएल लिलावात दोन खेळाडूंवर पैशांचा पाऊस

आयपीएल लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज असलेल्या मिचेल स्टार्क याला 24 कोटी 70 लाख रूपयांची सर्वाधिक बोली लागली आहे.  कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला खरेदी केलं आहे. त्यानंतर दुसरा खेळाडू पॅट कमिन्स याला 20 कोटी 50 लाख रूपयांची बोली लागली आहे. सनराईजर्स हैदराबाद संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनला 10 कोटी रुपयांना गुजरात टायटन्सने खरेदी केली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच