Video : हैदराबादचा सलग पाचवा पराभव, कोलकाता प्लेऑफच्या शर्यतीत कायम, रसेलची अष्टपैलू कामगिरी, पाहा Highlights Video

कोलकाताने 177 धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आणि हैदराबाद संघाला 123 धावांवर रोखले.

Video : हैदराबादचा सलग पाचवा पराभव, कोलकाता प्लेऑफच्या शर्यतीत कायम, रसेलची अष्टपैलू कामगिरी, पाहा Highlights Video
आंद्रे रसेलने आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम केला आहेImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 12:32 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद (SRH) सामना झाला. कोलकाताने टॉस जिंकून हैदराबाद पहिले गोलंदाजी दिली. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य ठेवलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकातानं 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. कोलकाताने 177 धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आणि हैदराबाद संघाला 123 धावांवर रोखले. कोलकाताकडून आंद्रे रसेलने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने 28 चेंडूत 49 धावांची नाबाद खेळी खेळली आणि त्यानंतर गोलंदाजीतही तीन विकेट्स घेतल्या. या विजयासह कोलकाताचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. कोलकाताने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 54 धावांनी एकतर्फी विजय नोंदवला.

रसेल जोरात, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

रसेलने दुहेरी धक्के दिले

आंद्रे रसेलने तिसऱ्या षटकात हैदराबादला दोन धक्के दिले. त्याने ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर मार्को यान्सेनला वॉक केले.

राहुल त्रिपाठी नऊ धावा करून बाद झाला

टीम साऊदीला त्याच्या दुसऱ्याच षटकात पहिला ब्रेकथ्रू मिळाला. त्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीचा झेल टिपला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राहुलने साऊथीच्या दिशेने हवेत धारदार शॉट खेळला आणि तो झेलबाद झाला. 12 चेंडूत नऊ धावा करून तो बाद झाला.

अभिषेकचे अर्धशतक हुकले

अभिषेक शर्मा शानदार फलंदाजी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचे अर्धशतक हुकले आणि 28 चेंडूत 43 धावा करून तो बाद झाला. दुसऱ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने अभिषेकला बिलिंग्सकडून झेलबाद केले.

अभिषेक शर्माचा हायलाईट व्हिडीओ, इथे क्लिक करा

मार्कराम बाद

एडन मार्कराम चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र उमेश यादवने त्याच्या शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याला बाद करून हैदराबादला मोठा धक्का दिला. मार्करामने बाद होण्यापूर्वी 25 चेंडूत 32 धावा केल्या. दरम्यान, हैदराबादच्या 100 धावाही पूर्ण झाल्या.

केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक धावा केल्या. तो 28 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. मलिकने एकाच षटकात या दोघांनाही परत पाठवले. पुढच्या षटकात श्रेयस अय्यरची विकेट घेतली. त्यानंतर टी नटराजनने केकेआरच्या रिंकू सिंगला एलबीडब्ल्यू केलं. पंचाने त्यानंतर त्याला बाद केलं. पण तरिही रिंकू हा खेळपट्टीवर उभा राहिल. यानंतर गोंधळ उडाला होता.

शशांकचा अप्रतिम कॅच, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मैदानात नेमकं काय झालं?

नवा विक्रम, 2000 धावा

केकेआरचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आयपीएलच्या इतिहासात नवा विक्रम केला आहे. चेंडूंच्या बाबतीत तो सर्वात जलद 2000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

आंद्रेचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शशांकच्या झेलची चांगलीच चर्चा

16 चेंडूत 26 धावा करून राणा उमरान मलिकचा बळी ठरला. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. उमराननेही रहाणेला त्याच्या पहिल्याच षटकात बाद केले. शशांक सिंगने (shashank singh) त्याचा अप्रतिम झेल टिपला. दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या अय्यरचा या झेलवर विश्वास बसत नव्हता. शशांकच्या झेलची चांगलीच चर्चा झाली.

शशांकचा अप्रतिम कॅच, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

केकेआर प्लेऑफच्या शर्यतीत कायम

कोलकाताचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. कोलकाताने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 54 धावांनी एकतर्फी विजय नोंदवला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.