मला खेळताच येत नाही…! रनमशिन्स विराट कोहलीचं आश्चर्यकारक विधान

इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जोस बटलरने विराट कोहलीबाबत मोठा खुलासा केला आहे. पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलमधील एका प्रसंगाचा उल्लेख केला. जोस बटलरच्या खुलाशामुळे विराट कोहलीच्या चाहत्यांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल.

मला खेळताच येत नाही...! रनमशिन्स विराट कोहलीचं आश्चर्यकारक विधान
विराट कोहली
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 17, 2025 | 3:57 PM

आयपीएल 2025 स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेचे जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने पटकावलं. 17 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जेतेपद मिळवलं. या जेतेपदात दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीची महत्त्वाची भूमिका होती. असं असताना विराट कोहलीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत जोस बटलरने विराट कोहलीसोबत चर्चा केली होती. या चर्चेचा उल्लेख जोस बटलरने एका मुलाखतीत केला. या चर्चेदरम्यान विराट कोहलीने दिलेलं उत्तर ऐकून जोस बटलरला आश्चर्याचा धक्का बसला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 81 शतकं ठोकलेल्या विराट कोहलीने त्याला सांगितलं की त्याला क्रिकेट खेळता येत नाही. इंग्लंडच्या माजी कर्णधार जोस बटलरने स्टूअर्ट ब्रॉडसोबत पॉडकास्ट फॉर द लव ऑफ क्रिकेट कार्यक्रमात हा खुलासा केला. त्याच्या सल्ल्यामुळे दबावात खेळण्याची ऊर्जा मिळाली होती.

जोस बटलरने सांगितलं की, आयपीएल 2022 मध्ये 863 धावा केल्या होत्या पण विराट कोहलीने या पर्वात 973 धावा करत सर्वाधिक धावांचा विक्रम केला होता. हा विक्रम जबरदस्त होता. मला पुढचं पर्व खूपच कठीण वाटत होतं. पुढच्या पर्वात कामगिरी कशी चांगली होईल? तेव्हा मी राजस्थान रॉयल्सकडून खेळत होतो. आमचा संघ आरसीबीसोबत ट्रेनिंग करत होतो. या दरम्यान मी विराट कोहलीला काही प्रश्न विचारले.

जोस बटलरने पुढे सांगितलं की, मी विचार केली की विराटला काही प्रश्न विचारेन. तेव्हा विराट कोहलीने नुकतीच फलंदाजी संपवली होती. मी विराट कोहलीला विचारलं की तू अपेक्षा कशा पूर्ण करतोस? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुझ्याकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. यावर विराट कोहलीने सांगितलं की, ‘कदाचित तुला फक्त तोच हंगाम मिळाला असेल, तो स्वीकार. ते पुन्हा करण्याचा प्रयत्न करू नकोस. हे सर्व चालू राहील.’

जोस बटलरने पुढे सांगितलं की, विराट कोहलीचं हे विधान ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. विराट कोहलीने सांगितलं की कधी कधी जेव्हा बॅट उचलतो तेव्हा मला वाटतं की मला क्रिकेट खेळताच येत नाही. मला वाटतं की मला काहीच माहिती नाही .