‘जाऊन सांगा त्याला, मी त्याचा आदर करत नाही’; वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूवर ख्रिस गेल बरसला

अवघ्या काही दिवसांत टी - 20 विश्वचषक (T20 World Cup) सुरू होत आहे. प्रत्येक संघाला हे विजेतेपद मिळवायचे आहे. वेस्ट इंडिजने हा चषक दोनदा उंचावला आहे आणि यावेळीही हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

'जाऊन सांगा त्याला, मी त्याचा आदर करत नाही'; वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूवर ख्रिस गेल बरसला
Chris Gayle
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 11:02 AM

मुंबई : अवघ्या काही दिवसांत टी – 20 विश्वचषक (T20 World Cup) सुरू होत आहे. प्रत्येक संघाला हे विजेतेपद मिळवायचे आहे. वेस्ट इंडिजने हा चषक दोनदा उंचावला आहे आणि यावेळीही हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पण त्याआधीच वेस्ट इंडीज क्रिकेटमध्ये गडबड सुरू झाली आहे. वेस्ट इंडिजचे दोन दिग्गज समोरासमोर उभे ठाकले आहेत. टी – 20 विश्वचषक संघात ख्रिस गेलच्या (Chris Gayle) निवडीमुळे हा गोंधळ उडाला आहे. संघात त्याच्या उपयुक्ततेबद्दल अनेक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. गेलने आता त्या लोकांना लक्ष्य केले आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोस (Curtly Ambrose) यांचे नाव आघाडीवर आहे. गेलने अॅम्ब्रोसवर हल्ला चढवला आहे, लोकांचे लक्ष वेधणे हाच त्याचा उद्देश असल्याचे गेलने म्हटले आहे. (I Have No Respect For Curtly Ambrose: Chris Gayle Hits Back For Commenting On His T20 World Cup Selection)

अॅम्ब्रोस गेलबद्दल म्हणाला होता की, गेल विश्वचषक संघातील अंतिम-11 मध्ये संघाची पहिली पसंती नाही. गेल मंगळवारी सकाळी रेडिओ स्टेशन द आइसलँड टी मॉर्निंग शोमध्ये म्हणाला, “मी तुम्हाला हे खासगीत सांगू शकतो आणि तुम्ही त्याला सांगू शकता की युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल अॅम्ब्रोसचा आदर करत नाही. मी अॅम्ब्रोसबद्दल बोलत आहे, मी अॅम्ब्रोसकडे निर्देश करत आहे, हो तुमचा अॅम्ब्रोस. जेव्हा मी वेस्ट इंडीज संघात आलो तेव्हा मला त्याच्याबद्दल खूप आदर होता. जेव्हा मी संघात आलो, तेव्हा मी त्याच्याकडून प्रेरणा घेत असे. पण मी आता माझ्या मनातलं बोलतोय. निवृत्त झाल्यापासून तो माझ्याविरोधात का बोलत आहे हे मला माहित नाही. माध्यमांमध्ये तो ज्या नकारात्मक गोष्टी सांगतो, त्याला केवळ लक्ष वेधायचे आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु तो लोकांचे लक्ष वेधून घेतो. म्हणूनच मी त्याला हवं ते अटेन्शन देत आहे.”

प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ हवा

क्रिकबझने आपल्या अहवालात लिहिले आहे की, जेव्हा या प्रकरणी अॅम्ब्रोस यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की यासाठी त्यांना वेळ हवा आहे. ते म्हणाले, “मी प्रतिक्रिया देईन पण त्याने जे म्हटले आहे ते मला काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे. जेव्हा मी प्रतिक्रिया देण्यास तयार होईन, तेव्हा मी तुम्हाला मेसेज करेन.”

…तर गेल अशा माजी खेळाडूंचा आदर करणार नाही

गेल एवढ्यावरच थांबला नाही. त्याने अॅम्ब्रोसवर भाष्य करणे सुरू ठेवले आहे. तो म्हणाला, “अॅम्ब्रोजशी माझे नाते संपले आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर नाही. जेव्हा जेव्हा मी त्याला भेटेन, तेव्हा मी म्हणेन की, इतके नकारात्मक राहणे थांबवा, विश्वचषकापूर्वी संघाला पाठिंबा द्या. हा संघ निवडला गेला आहे आणि आता आमच्या संघाला पाठिंबा देण्याची गरज आहे. आम्हाला नकारात्मक ऊर्जा नको आहे. इतर संघांचे माजी खेळाडू त्यांच्या संघांचे समर्थन करतात. आमच्या संघाचे खेळाडू हे का करू शकत नाहीत? आम्ही दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे आणि आम्ही तिसऱ्यांदा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाहेर काय घडत आहे यावर टीम लक्ष ठेवून आहे. याचा परिणाम संघावर होईल. जर माजी खेळाडू संघाबद्दल नकारात्मक असतील तर ख्रिस गेल त्यांचा आदर करणार नाही.

इतर बातम्या

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला

भारतीय संघाच्या T20 World Cup च्या वेळापत्रकात बदल, महत्त्वाच्या संघासोबतचा सामना रद्द!

(I Have No Respect For Curtly Ambrose: Chris Gayle Hits Back For Commenting On His T20 World Cup Selection)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.