AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World cup 2021: 135 दिवसांपासून मुलीला पाहिलं नाही; वैतागलेल्या श्रीलंकेच्या बॅटिंग गुरुचा संघाला रामराम

टी-20 विश्वचषक स्पर्धेत सध्या फक्त राऊंड वनचे सामने सुरू झाले आहेत. स्पर्धेचा खरा खेळ अजून सुरू व्हायचा आहे. त्याआधीच श्रीलंकेच्या बॅटिंग गुरुने संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

T20 World cup 2021: 135 दिवसांपासून मुलीला पाहिलं नाही; वैतागलेल्या श्रीलंकेच्या बॅटिंग गुरुचा संघाला रामराम
Sri Lanka Team
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 22, 2021 | 2:30 PM
Share

मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेत सध्या फक्त राऊंड वनचे सामने सुरू झाले आहेत. स्पर्धेचा खरा खेळ अजून सुरू व्हायचा आहे. त्याआधीच श्रीलंकेच्या बॅटिंग गुरुने संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेबद्दल बोलत आहोत, ज्याचा फलंदाजी सल्लागार म्हणून श्रीलंका संघासोबतचा प्रवास स्पर्धेतील सराव सामन्यांसोबत संपला आहे. युएईमध्ये श्रीलंकन ​​पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत जयवर्धने याने त्याच्या निर्णयाचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे. (‘I haven’t seen my daughter for 135 days’: Sri Lanka Mahela Jayawardene to leave T20 World Cup bio-bubble)

जयवर्धने म्हणाला की, “माझ्यासाठी हे कठीण होत आहे. मी गेल्या 135 दिवसांसापासून बायो बबलमध्ये आहे. जून महिन्यापासून हे चक्र सुरु आहे. पण, आता मी बायो बबल किंवा क्वारंटीनमध्ये राहू शकत नाही. मी तांत्रिकदृष्ट्या (ऑनलाईन) संघासाठी उपलब्ध असेन. मला आशा आहे की, संघ व्यवस्थापन मला समजून घेईल, एक वडील म्हणून 135 दिवस आपल्या मुलीपासून दूर राहणे सोपी गोष्ट नाही. मी तिला इतके दिवस पाहिले नाही. त्यामुळे आता मला घरी जायचे आहे.”

महेला जयवर्धने पात्रता फेरीतील श्रीलंका संघाच्या कामगिरीवर खूश होता. मात्र, त्याने काही त्रुटीही दाखवल्या. जयवर्धने म्हणाला, “पात्रता फेरीत श्रीलंकेसाठी काही गोष्टी चांगल्या झाल्या. पण काही गोष्टी आहेत ज्या निश्चित केल्या जाऊ शकतात. त्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खेळाडूंची भूमिका. प्रत्येक खेळाडूने त्याच्या भूमिकेत स्पष्ट असणे महत्वाचे आहे. संघाच्या प्रशिक्षकाशी बोलल्यानंतर मला जे वाटले त्यानुसार संघामध्ये अपयशाची भीती आहे. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्हाला कोणत्याही भीतीशिवाय टी – 20 क्रिकेट खेळावे लागेल.

बॉलिंग ब्रिगेड सज्ज : जयवर्धने

जयवर्धने म्हणाला की, “आम्हाला प्रत्येक खेळाडूशी स्वतंत्रपणे बोलावे लागेल. आम्हाला संघाच्या फलंदाजीवरही काम करण्याची गरज आहे. संघाच्या गोलंदाजी ब्रिगेडमध्ये कौशल्य आहे. त्यांनी आतापर्यंत त्या कौशल्यांचा चांगला वापर केला आहे. जर आपण भविष्यात देखील असे केले तर आशा आहे की ते विरोधी संघांसाठी अडचणी निर्माण करू शकतात.

माहेलाने निश्चितपणे सांगितले आहे की, तो श्रीलंका संघासाठी तांत्रिक माध्यमांद्वारे नेहमीच उपलब्ध असेल. परंतु, मैदानामधील उपलब्धता आणि तंत्रज्ञानाद्वारे उपस्थिती यात फरक आहे. अशा स्थितीत महेला जयवर्धनेला सोडणे श्रीलंका संघासाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: ओमानला मात देत स्कॉटलंडची ऐतिहासिक कामगिरी, सुपर 12 मध्ये मिळवली एन्ट्री, आता सामना भारताशी

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

IPL 2022 मध्ये कोणते 3 खेळाडू मुंबई इंडियन्स करणार रिटेन?, दोन मॅच विनर्सचं भविष्य धोक्यात

(‘I haven’t seen my daughter for 135 days’: Sri Lanka Mahela Jayawardene to leave T20 World Cup bio-bubble)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या