
टीम इंडियाने रविवारी 8 मार्चला सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ऐतिहासिक असा टी 20i वर्ल्ड कप विजय मिळवला. भारताची टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण तिसरी तर सलग दुसरी वेळ ठरली. भारताने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या महाअंतिम सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. इंडिया यासह गतविजेता आणि यजमान म्हणून वर्ल्ड कप ट्रॉफी कायम ठेवणारी पहिली टीम ठरली. विजयानंतर हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. गंभीरने या पत्रकार परिषदेत संबोधित करताना भारताच्या वर्ल्ड कप विजयाचं श्रेय दिग्गज जोडीला दिलं आहे. गंभीरने माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सीओई प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना दिलं.
“मी ही टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित करतो”, असं गंभीरने म्हटलं. सूर्याने पत्रकार परिषदेत माजी हेड कोचचा राहुल भाई (राहुल द्रविड) असा उल्लेख केला.
“द्रविडने भारताला एका चांगल्या स्थानी आणून ठेवलं. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली, विशेष करुन 2024 मध्ये टी 20i वर्ल्ड कप जिंकला”, असं गौतम गंभीर यांनी म्हटलं. सोबतच गंभीरने व्हीव्हीएस लक्ष्म्ण यांच्या सीओई प्रमुख म्हणून कामगिरीचं कौतुक केलं.
“लक्ष्मणने युवा खेळाडूंसाठी पूल तयार केला आहे. ते खेळाडू टीममध्ये येऊन चांगली कामगिरी करतात”, असं म्हणत गंभीरने लक्ष्मण खेळाडूंमागे घेत असलेल्या मेहनतीचं महत्त्व अधोरेखित केलं. तसेच गंभीरने निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांचेही आभार मानले. “त्यांच्यावर सोशल मीडियावरुन फार टीका झाली, मात्र त्यांनी त्यांची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली”, असं गंभीरने म्हटलं.
गंभीर-सूर्याची संयुक्त पत्रकार परिषद
Gautam Gambhir said, ” I want to dedicate this T20 World Cup to Rahul Dravid and VVS Laxman. What Rahul Bhai has done for Indian cricket. VVS for how he has been leading the CoE”.#INDvsNZ pic.twitter.com/Psm1kRRQjv
— Khan (@ccricket713) March 9, 2026
संजू सॅमसन याने सलग दुसऱ्यांदा केलेल्या 89 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 256 रन्सचं टार्गेट ठेवलं. मात्र न्यूझीलंडला जिंकणं सोडा संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 159 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे टी 20i वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.