Icc Champions Trophy 2025 : रचीन रवींद्रकडून वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, उपांत्य फेरीत ऐतिहासिक शतक, दक्षिण आफ्रिकेची धुलाई

Rachin Ravindra Century SA vs NZ : रचीन रवींद्र याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केलं आहे. रचीनचं हे याच स्पर्धेतील एकूण दुसरं शतक ठरलंय.

Icc Champions Trophy 2025 : रचीन रवींद्रकडून वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, उपांत्य फेरीत ऐतिहासिक शतक, दक्षिण आफ्रिकेची धुलाई
rachin ravindra century sa vs nz ct 2025
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 05, 2025 | 5:48 PM

न्यूझीलंडचा युवा आणि संयमी फलंदाज रचीन रवींद्र याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत इतिहास घडवला आहे.रचीनने उपांत्य फेरीतील सामन्यात लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलं आहे. रचीनचं हे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील दुसरं आणि एकदिवसीय कारकीर्दीतील एकूण पाचवं शतक ठरलं. रचीनने या शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच रचीनने शतकासह अनेक विक्रम आपल्या नाववार केले आहेत. भारतीय वंशाच्या या खेळाडूने नक्की काय विक्रम केलाय? सविस्तर जाणून घेऊयात.

रचीन याने 24 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध 112 धावांची खेळी केली.त्यानंतर आता रचीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 31 व्या ओव्हरपर्यंत 98 धावा केल्या. त्यानंतर रचीनने 32 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर 2 रन्स घेतल्या. रचीनने यासह शतक पूर्ण केलं. रचीनने 93 चेंडूत 107.53 च्या स्ट्राईक रेटने 100 धावा पूर्ण केल्या. रचीनने या खेळीत 1 षटकार आणि 12 चौकार लगावले. रचीन यासह एकाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडकडून 2 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

रचीन रवींद्रकडून वर्ल्ड रेकॉर्ड

रचीन रवींद्र याने अवघ्या 13 डावांत 5 शतकं केली आहेत. विशेष म्हणजे रचीनने त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील पाच शतकं ही आयसीसी स्पर्धेतच केली आहेत. रचीनने भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत 3 शतकं झळकावली होती.

आयसीसी वनडे स्पर्धेत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक शतकं

दरम्यान रचीनने आयसीसी वनडे स्पर्धेत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम आणखी भक्कम केला आहे. रचीनने 13 डावांमध्ये आयसीसी वनडे स्पर्धेत 5 वेळा शतक केलं आहे. केन विलियमसन याने 36 तर नॅथन एस्टल याने 35 डावांत प्रत्येकी 3-3 शतकं केली आहेत.

शतकवीर रचीन रवींद्र

दक्षिण अफ्रीका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), रयान रिकेलटन, रासी वन डेर डुसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, एडन मार्करम, वियान मुल्डर, मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, ​​रचीन रवींद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, कायल जेमीन्सन आणि विलियम ओरूर्के.