BAN vs NZ : रचीन रवींद्रचं शतक, न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये, बांगलादेशचा 5 विकेट्सने धुव्वा, पाकिस्तानचंही पॅकअप
Bangladesh vs New Zealand Match Result Icc Champions Trophy 2025 : न्यूझीलंडने बांगलादेशवर 5 विकेट्ने विजय मिळवला. न्यूझीलंडचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.

न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात बांगलादेशवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने न्यूझीलंडला विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 46.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. रचीन रवींद्र हा न्यूझीलंडच्या विजयाचा नायक ठरला. रचीन रवींद्र याने शतकी खेळी केली. तर टॉम लॅथम याने अर्धशतकी खेळी केली. यासह न्यूझीलंड आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर बांगलादेश आणि पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं आहे.
न्यूझीलंडसाठी रचीन रवींद्र याने 12 चौकार आणि 1 षटकारासह 112 धावांची खेळी केली. रचीनचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील आणि आयसीसी स्पर्धेतील चौथं शतक ठरलं. रचीननंतर न्यूझीलंडसाठी टॉम लॅथम याने 76 बॉलमध्ये 55 रन्स केल्या. डेव्हॉन कॉनव्हे याने 30 धावांचं योगदान दिलं. केन विलियमसन याने 5 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर ग्लेन फिलिप्स आणि मायकल ब्रेसवेल या दोघांनी न्यूझीलंडला विजयापर्यंत पोहचवलं. फिलिप्स याने 21 तर ब्रेसवेलने 11 धावा जोडल्या. तर बांगलादेशकडून तास्किन अहमद, नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान आणि रिशाद हौसेन या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
न्यूझीलंड-इंडिया सेमी फायनलमध्ये, पाकिस्तान-बांगलादेश आऊट
या विजयासह ए ग्रुपचं चित्र स्पष्ट झालं आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडिया या दोघांनी स्पर्धेत एक पाऊल पुढेच्या दिशेने टाकलं आहे. दोघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर गतविजेच्या पाकिस्तान आणि बांगलादेशचा या स्पर्धेतून बाजार उठला आहे.
न्यूझीलंड-भारत उपांत्य फेरीत
New Zealand make it two wins in two games, and are into the #ChampionsTrophy 2025 semi-finals 🤩 pic.twitter.com/UwPpYWPfp5
— ICC (@ICC) February 24, 2025
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, मेहदी हसन मिराज, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, जाकर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, नाहिद राणा आणि मुस्तफिजुर रहमान.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनव्हे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लाथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरोर्क.
