AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया Champions Trophy 2025 साठी पाकिस्तानमध्ये जाणार? आयसीसीचा मोठा निर्णय

ICC Champions Trophy 2025 : टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद रंगला होता. आता आयसीसीने घेतलेल्या निर्णयामुळे अखेर या वादावर पडदा पडला आहे.

टीम इंडिया Champions Trophy 2025 साठी पाकिस्तानमध्ये जाणार? आयसीसीचा मोठा निर्णय
ICC Champions Trophy 2025 Hybrid Model india Jay shah
| Updated on: Dec 13, 2024 | 10:58 PM
Share

क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. जय शाह यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच  अवघ्या काही दिवसांमध्येच मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने होणार असल्याचं समोर आलं आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. या आयसीसी चॅम्पियनशीप ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बीसीसीआयचा टीम इंडियाला सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये पाठवण्यास विरोध होता. या मु्द्द्यावरुन अनेक महिने चांगलाच वाद पाहायला मिळाला. मात्र अखेर आयसीसीने हायब्रिड मॉडेलला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता या स्पर्धेतील सामने खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाण्याची गरज नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

रिपोर्ट्सनुसार, पीसीबी आणि बीसीसीआय यांच्या संमतीनंतर हायब्रिड मॉडेलला मंजुरी मिळाली आहे. हायब्रिड मॉडेलमुळे टीम इंडियाचे या स्पर्धेतील सामने त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये फक्त 10 सामनेच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच टीम इंडिया उपांत्य आणि अंतिम फेरीत पोहचली तर ते सामनेही दुबईत होतील. मात्र जर टीम इंडिया साखळी फेरीतूनच बाहेर झाली तर उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामने हे पाकिस्तानमध्येच होतील.

पाकिस्तानला दिलासा

पाकिस्तानला एका बाबतीत दिलासा मिळाल्याचं म्हटलं जात आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 चं आयोजन हे भारत आणि श्रीलंका येथे करण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान या टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतात येणार आहे. त्यामुळे पाकिस्तान त्यांचे सामने हे श्रीलंकेत खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

बीसीसीआय, झुकेगा नही साला!

पाकिस्तानला 28 वर्षांनंतर यजमानपद

दरम्यान पाकिस्तानला 1996 नंतर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेचं यजमानपदाचा मान मिळाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. मात्र या स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच 7 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. याआधी 2017 साली झालेल्या अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.