टीम इंडियाचा सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धोबीपछाड, दुसऱ्या सामन्यात घडलं असं…

T20 World Cup 2026 Points Table: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताने अमेरिकेनंतर दुबळ्या नामिबियालाही पराभवाचं पाणी पाजलं आहे. यासह गुणतालिकेत पाकिस्तान

टीम इंडियाचा सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धोबीपछाड, दुसऱ्या सामन्यात घडलं असं...
टीम इंडियाचा सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धोबीपछाड, दुसऱ्या सामन्यात घडलं असं...
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 12, 2026 | 10:37 PM

ICC Men’s T20 World Cup 2026 Match Points Table: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना सुपर 8 फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणारा संघ सुपर 8 फेरीत जागा पक्की करेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी आग्रही असतील. हा सामना श्रीलंकेच्या कोलंबोत होणार आहे. पाकिस्तान गेल्या दोन आठवड्यांपासून येथे आहे. त्यामुळे त्यांना या खेळपट्टीचा चांगला अंदाज आहे. त्यामुळे पाकिस्तानला कमी लेखून काही चालणार नाही. भारताला या सामन्यात चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.  असं असताना या सामन्यापूर्वी पाकिस्तान भारतीय संघाने दणका दिला आहे. कारण भारताने दुसरा सामना जिंकताच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, नेदरलँड, नामिबिया आणि अमेरिका हे संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान यांनीच सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे सुपर 8 फेरीसाठी दावेदार आहेत. भारतीय संघ 4 गुण आणि +3.050 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानने 2 पैकी 2 सामने जिंकून 4 गुण आणि +0.932 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर नेदरलँडचा संघ 2 पैकी एका सामन्यात विजयी मिळून 2 गुण आणि +0.356 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर नामिबिया आणि अमेरिका यांनी सुरूवातीचे दोन्ही सामने गमवल्याने स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. आता नेदरलँड काही उलटफेर करते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

भारत नामिबिया सामना

नामिबिया विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने गमावला आणि प्रथम फलंदाजी आली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 209 धावा केल्या. तसेच विजयासाठी 210 धावांचं आव्हान ठेवलं. पण नामिबियाचा संघ या धावांचा पाठलाग करताना गडबडला. सुरुवात चांगली होईल असं वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही. संपूर्ण सामन्यावर भारतीय संघाची पकड दिसली. नामिबियाचा संघ 18.2 षटकात सर्व गडी गमवून 116 धावा करू शकला. हा सामना भारताने 93 धावांनी जिंकला.