
आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह कमी वयात आयसीसीचे अध्यक्ष ठरले आहेत. अमित शाह हे वडील असल्यामुळे त्यांच्यावर वशिलेबाजीची टीका होते. पण जय शाह यांनी आपल्या जिल्हा स्तरावरून क्रिकेटमध्ये प्रशासकीय पातळीवर काम पाहायला सुरूवात केली होती. तिथून त्यांचा झालेला प्रवास आता जागतिक क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षापर्यंत पोहोचलाय. येत्या 1 डिसेंबरपासून 2024 पासून ते आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार आपल्या हाताता घेणार आहेत. वयाच्या 20 व्या वर्षी जय शाह यांनी 2009 जिल्हा स्तरावर केंद्रीय क्रिकेट बोर्ड अहमदाबाद (CBCA) काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर 2013 मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनचे (GCA) कार्यकारी म्हणून सहसचिव झाले. गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये गेल्यावर जय शाह यांनी 2013 मध्ये सहसचिव पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, जय शाहांनी तत्कालीन मोटेरा स्टेडियमला संजीवनी दिली. जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून आता अहमदाबादच्या स्टेडियमची गणना होते. 2020 मध्ये, 1 लाख 32...