ICC Rankings | शुबमन गिल याची वनडे रँकिंगमध्ये ‘लाँग जम्प’, विराट कोहली याला पछाडलं
Icc Odi Ranking | आंततराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल अर्थात आयीसीसीने एकदिवसीय क्रिकेट रँकिंग प्रसिद्ध केली आहे. यामध्ये शुबमनने धमाका केला आहे.

मुंबई | आयसीसीने पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यनंतर वनडे रँकिंग जाहीर केली आहे. टीम इंडियाचा युवा सलामीवीर बॅट्समन शुबमन गिल याने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. शुबमन गिल हा वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये एक स्थानाने झेप घेतली आहे. गिल यासह पाचव्यावरुन चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. गिलच्या नावावर 743 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. शुबमन गिल या 2023 वर्षात धमाकेदार कामगिरी करत आहेत. गिलने या वर्षात आतापर्यंत एकूण 12 सामन्यांमध्ये 3 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 750 धावा केल्या आहेत. शुबमन गिलचा हायस्कोअर हा 208 रन्स आहे.
जसप्रीत बुमराह याला फायदा
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि स्पिनर रवी बिश्नोई या दोघांना टी 20 रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. बुमराहने आयर्लंड विरुद्ध्या टी 20 मालिकेतून कमबॅक केलं. बुमराह आयर्लंड विरुद्ध कॅप्टन्सी करतोय.बुमराहने 7 स्थांनांची झेप घेत 84 व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर बिश्नोईने 17 स्थांनांची लाँग जम्प घेत 65 व्या स्पॉचला गेला आहे. तर सूर्यकुमार यादव हा टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वलस्थानी कायम आहे.
बाबर आझम नंबर 1
पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम याने वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थान कायम राखलंय. तर इमाम उल हक तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम याला अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही.
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण कुठे?
Pakistan stars surge in the @MRFWorldwide ICC Men’s ODI Player Rankings after a dominant display against Afghanistan 🔥https://t.co/PEXvb6R2K8
— ICC (@ICC) August 23, 2023
या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 11 व्या स्थानी कायम आहे. तर कसोटीत टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन हा पहिल्या स्थानी आहे. तर रविंद्र जडेजा यानेही अव्वल स्थान कायम ठेवलंय.
दरम्यान टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आयर्लंडला क्लिन स्वीप देण्याचा प्रयत्न असणार आहे.
