AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Ranking : वनडे क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा, कोण आहेत टॉप 5 मध्ये ते जाणून घ्या

आयसीसीने वनडे क्रिकेटमधील क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय खेळाडूंचा वरचष्मा असल्याचं दिसून आलं आहे. बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. पण असं असूनही भारताच्या तीन खेळाडूंनी टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली आहे.

ICC Ranking : वनडे क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा, कोण आहेत टॉप 5 मध्ये ते जाणून घ्या
| Updated on: Aug 21, 2024 | 3:35 PM
Share

आयसीसी वनडे रँकिंगवरून मागच्या आठवड्यात बराच वादंग झाला होता. बाबर आझमचं नाव वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. दरम्यान आयसीसीने मागच्या आठवड्यात एकही वनडे सामना झालेला नसताना नवी वनडे रँकिंग जाहीर केली आहे. वनडे क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. टॉप 5 फलंदाजांमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. वनडे रँकिंगमध्ये अजूनही बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. त्याची रेटिंग 824 इतकी आहे. बाबर आझमने मागच्या आठ महिन्यात एकही वनडे सामना खेळलेला नाही. असं असूनही पहिल्या स्थानावर आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यात रोहित शर्माने बॅक टू बॅक दोन अर्धशतकं झळकावली होती. त्याचा त्याला फायदा झाला आहे. रोहित शर्माची रेटिंग 765 इतकी असून बाबर आझमला धोबीपछाड देऊ शकतो. पण या वर्षात टीम इंडियाचा एकही वनडे सामना नाही. त्यामुळे हे गणित कठीण आहे.

तिसऱ्या स्थानावर शुबमन गिल असून त्याची वनडे रेटिंग 763 इतकी आहे. रोहित आणि शुबमन यांच्यात फक्त दोन गुणांचा फरक आहे. त्यामुळे वनडे सामन्यात ही चुरस आणखी तगडी होईल. विराट कोहली आयर्लंडच्या हॅरी टॅक्टरसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. या दोघांची वनडे रेटिंग 746 आहे. दुसरीकडे, या वर्षात जास्त वनडे सामने नसल्याने क्रमावारीत फारसा बदल होणार नाही हे निश्चित आहे. सर्वच संघांचा कसोटी आणि टी20 मालिकेवर लक्ष आहे. आजपासून बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरु झाली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात कसोटी क्रमवारीत उलथापालथ होऊ शकते.

दुसरीकडे, वुमन्स वनडे रँकिंगमध्ये स्मृती मंधानाला फायदा झाला आहे. तिच्या क्रमवारीत एका क्रमाने सुधारणा झाली असून तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. स्मृती मंधानाची रेटिंग 738 इतकी आहे. तर हरमनप्रीत कौर या क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. इंग्लंडची नॅटली स्किवर ब्रंट 783 गुणांसह पहिल्या, तर दक्षिण अफ्रिकेची लॉरा वॉल्वार्ड्ट 756 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त फॉर्मात असलेली श्रीलंकेची चमारी अट्टापट्टू 727 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी असून तिचे 704 गुण आहेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.