मुंबई: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप (ICC T 20 World cup) स्पर्धा होणार आहे. इंग्लंडने या स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. जोस बटलर (Jos buttler) इंग्लंडचा कॅप्टन आहे. इंग्लंडच्या संघातून अनुभवी सलामीवीर जेसन रॉयला (Jason Roy) वगळण्यात आलय. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि क्रिस वोक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. मागचे काही महिने दुखापतीमुळे दोघेही संघाबाहेर होते. ऑलराऊंडर बेन स्टोक्सचही संघात पुनरागमन झालय. मागच्या वर्ल्ड कप मध्ये तो संघाबाहेर होता. एखाद्या मोठ्या स्पर्धेत जोस बटलर पहिल्यांदा इंग्लिश संघाचे नेतृत्व करणार आहे. यावर्षी जून महिन्यात इयॉन मॉर्गनने निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर टी 20 आणि वनडे संघाच्या कर्णधारपदी जोस बटलरची नियुक्ती करण्यात आली आहे.
बटलरला सध्या दुखापत झाली आहे. तो लवकर फिट होईल, अशी संघाला अपेक्षा आहे. 15 सदस्यीय संघात आश्चर्यतकारक असा कुठलाही निर्णय झालेला नाही. जेसन रॉयला वर्ल्ड कप संघातून डच्चू मिळू शकतो, अशी कित्येक दिवसापासून चर्चा होती.
इंग्लंडने 2019 साली पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. रॉयने त्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण सध्या त्याचा फॉर्म बिलकुल चांगला नाहीय. द हंड्रेड स्पर्धेतही तो विशेष चमक दाखवू शकला नाही. सलग दोन डावात खात उघडू शकला नाही. त्यामुळे त्याच संघाबाहेर जाणं जवळपास निश्चित होतं.
Squad 🙌 #T20WorldCup 🏏 🌏 🏆 pic.twitter.com/k539Gzd5Ka
— England Cricket (@englandcricket) September 2, 2022
जेसन रॉयच्या जागी युवा सलामीवीर फिल सॉल्टचा संघात समावेश करण्यात आला आहे. कॅप्टन बटलर सोबत जॉनी बेयरस्टो सलामीला येऊ शकतो.
T20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा स्क्वॉड
जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेविड विली, क्रिस वोक्स आणि मार्क वुड