AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli ने आपल्या बॅटिंगने देशवासियांना जिंकलं, पण त्यांचं कोट्यवधीच नुकसान

विराट कोहलीच्या बॅटिंगने सर्वांना समाधान, आनंद दिला. मग कोणाचं नुकसान कसं काय होऊ शकतं?

Virat Kohli ने आपल्या बॅटिंगने देशवासियांना जिंकलं, पण त्यांचं कोट्यवधीच नुकसान
Virat-Kohli Image Credit source: PTI
| Updated on: Oct 25, 2022 | 12:11 PM
Share

मुंबई: टीम इंडियाने (Team India) रविवारी पाकिस्तान विरुद्धचा (IND vs PAK) सामना जिंकला. टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाने हा विजय मिळवला. त्यामुळे दिवाळीच्या आंनदात आणखी भर पडली. तमाम देशवासियांचा ऊर अभिमानाने भरुन आला. टीम इंडियाचा विराट विजय देशवासियांना एक वेगळं समाधान देऊन गेला. विराट कोहली या मॅचचा हिरो ठरला.

विराटची बॅटिंग आणि व्यापाऱ्यांच्या तोट्याचा काय संबंध?

विराटवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. पण याच विराट कोहलीमुळे व्यापारी वर्गाला थोडा तोटा सहन करावा लागला. तुम्ही म्हणाल विराटची बॅटिंग आणि व्यापाऱ्यांच्या तोट्याचा काय संबंध?. खरंतर भारत-पाकिस्तान सामना ऐन दिवाळीमध्ये झाला. त्यात रविवारी ही मॅच होती.

शॉपिंगला फटका

दिवाळीतला रविवारी हा ग्राहक आणि व्यापारी दोघांसाठी सोयीचा दिवस असतो. ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडतो, तर व्यापाऱ्यांकडच्या सामनाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण रविवारी भारत-पाकिस्तान सामना, त्यात विराट कोहलीच्या बॅटिंगमुळे दिवाळी शॉपिंगला फटका बसला. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

किती टक्क्याने घट?

विराट कोहलीची बॅटिंग सुरु असताना शॉपिंगमध्ये जवळपास 20 टक्क्याने घट झाली. भारत-पाकिस्तान सामन्याच्या संपूर्ण वेळेत UPI व्यवहारात 7 ते 20 टक्क्याने घट झाली. कोहलीने या मॅचमध्ये 53 चेंडूत नाबाद 82 धावा फटकावल्या. ग्रुप 2 मध्ये सुपर 12 राऊंडमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर 4 विकेट राखून विजय मिळवला.

पाकिस्तानची बॅटिंग सुरु असताना....

भारत-पाकिस्तान सामना मोठ्या प्रमाणात टीव्हीवर पाहिला जातो. मॅच सुरु होताच यूपीआय ट्रॅनजॅक्शनमध्ये घट झाली. लोक शॉपिंगसोडून मॅचकडे वळले. पाकिस्तानची बॅटिंग सुरु असताना यूपीआय व्यवहार सरासरीपेक्षा कमी होता.

शॉपिंग नॉर्मल कधी झाली?

भारतपे डाटानुसार भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी शॉपिंग पीकवर होती. मॅच सुरु झाल्यानंतर त्यात 7 टक्के घट झाली. विराट कोहलीची बॅटिंग सुरु असताना त्यात मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली. मॅच संपल्यानंतर यूपीआय व्यवहार नॉर्मल झाले. दुपारी 1.30 ते संध्याकाळी 5.45 या शॉपिंगच्या प्राइम वेळात व्यापाऱ्याचं नुकसान झालं. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर शॉपिंगमध्ये वाढ झाली.

Follow Us
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेस
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेसवर डबल संकट; बंगालमध्ये खळबळ!
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग...
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश
मोठी खळबळ!दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन
मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; सत्तारांच्या वक्तव्यावर महाजनांचा पलटवार!
Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारा
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू
मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
Mumbai | मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्
Navi Mumbai | शरद पवार गटाच्या आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्....
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज...
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज दाखल करताच...