Icc T20i World Cup 2026 : तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, कुणाला संधी?

Icc T20i World Cup 2026 : कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये होणाऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केलीय. जाणून घ्या कुणाला संधी मिळालीय.

Icc T20i World Cup 2026 : तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, कुणाला संधी?
India vs England T20i Cricket
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 13, 2026 | 8:46 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत यजमान टीम इंडिया आपल्या मोहिमेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना रविवारी 15 फेब्रुवारीला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. मात्र त्याआधी शनिवारी 14 फेब्रुवारीला स्कॉटलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने परंपरेनुसार सामन्याच्या 24 तासांआधी आपल्या अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. इंग्लंडने या सामन्यासाठी कुणाला संधी दिलीय हे सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंड तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज

इंग्लंडला या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडला या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 2 पैकी फक्त एकमेव सामनाच जिंकता आला आहे. इंग्लंडला या मोहिमेतील पहिल्या सामन्यात नवख्या नेपाळने चांगलंच झुंजवलं होतं. इंग्लंडने या सामन्यात अवघ्या 4 धावांनी निसटता विजय मिळवला होता. नेपाळ 185 धावांचा पाठलाग करताना 180 धावांपर्यंतच पोहचली. त्यामुळे इंग्लंड मोठ्या उलटफेरपासून वाचली.

त्यानंतर वेस्ट इंडिज टीमने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये बुधवारी 11 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळवला. त्यामुळे आता इंग्लंडसाठी सुपर 8 च्या हिशोबाने तिसरा सामना हा निर्णायक असा आहे. इंग्लंडसमोर स्कॉटलंडचं आव्हान असणार आहे.मात्र स्कॉटलंडला गृहीत धरण्याची चूक इंग्लंडला करुन जमणार नाही. या स्पर्धेत आतापर्यंत लिंबुटूंब समजल्या जाणाऱ्या संघांनी उल्लेखनीय कामगिरी केलीय. त्यामुळे स्कॉटलंड कशी कामगिरी करते हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.

इंग्लंडकडून बदल नाही

दरम्यान इंग्लंडने स्कॉटलंड विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. साधारणपणे पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल अपेक्षित असतो किंवा तसं केलं जातं. मात्र टीम मॅनेजमेंटने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आता इंग्लंड सुपर 8 च्या हिशोबाने निर्णायक असलेल्या सामन्यात कशी कामगिरी करते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंड तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद.