ICC Test Rankings: जो रुट पुन्हा नंबर 1, शुबमन गिल याला मोठा झटका

ICC Test Batsman Rankings: आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाच्या कर्णधार उपकर्णधारासह सलामीवीर यशस्वी जैस्वाल या तिघांना मोठा झटका लागला आहे. तर जो रूट याने पुन्हा एकदा पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

ICC Test Rankings: जो रुट पुन्हा नंबर 1, शुबमन गिल याला मोठा झटका
Joe Root England Cricket Team
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 16, 2025 | 5:23 PM

इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर रंगतदार झालेल्या सामन्यात 22 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने ऐतिहालिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. या सामन्यानंतर आता आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत इंग्लंडचा स्टार आणि अनुभवी फलंदाज याने पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली आहे.

जो रुट याने पुन्हा एकदा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत कारनामा करुन दाखवला आहे. जो रुट पुन्हा नंबर 1 फलंदाज झाला आहे. रुटने त्याचा सहकारी हॅरी ब्रूक याला पछाडत ही कामगिरी केली आहे. हॅरीला त्याचं सिंहासन आठवड्यापेक्षा जास्त काळ वेळ टिकवता आलं नाही. हॅरीने गेल्याच आठवड्यात जो रुट याल मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली होती. मात्र आता जो रुटने पुन्हा त्याचं स्थान मिळवलं आहे. तर ताज्या आकडेवारीनुसार, ब्रूकची 2 स्थानांनी घसरण झाली आहे. हॅरी आता तिसऱ्या स्थानावर आहे.

जो रुटला लॉर्ड्स कसोटीत केलेल्या कामगिरीचा फायदा क्रमवारीत झाला. रुटने दोन्ही डावात एकूण 144 धावा केल्या. रुटने पहिल्या डावात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या. रुटने पहिल्या डावात शतक केलं. रुटचं लॉर्ड्समधील हे आठवं तर एकूण 37 वं कसोटी शतक ठरलं. रुटने पहिल्या डावात 104 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात निर्णायक 40 धावा केल्या.

तर हॅरी ब्रूकला भारतीय गोलंदाजांसमोर काही खास करता आलं नाही. हॅरीने दोन्ही डावात मिळून एकूण 34 धावा केल्या. हॅरीने पहिल्या डावात 11 तर दुसऱ्या डावात 23 धावा केल्या.

हॅरी ब्रूक 862 रेटिंग पॉइंटसह तिसऱ्या स्थानी आहे. जो रुटच्या खात्यात 888 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन दुसऱ्या स्थानी आहे. केनची रेटिंग 867 इतकी आहे.

शुबमन-यशस्वीला फटका

तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल आणि ओपनर यशस्वी जैस्वाल या दोघांना तिसऱ्या कसोटीतील निराशाजनक कामगिरीचा फटका बसला आहे. या दोघांनी तिसऱ्या कसोटीत काही खास केलं नाही. त्यामुळे यशस्वीसमोर टॉप 5 मधून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. तर शुबमन याला टॉप 10 मधून बाहेर होण्याचा धोका आहे.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने यशस्वी जैस्वालला पछाडत चौथं स्थान काबिज केलं आहे. त्यामुळे यशस्वीची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

शुबमन गिल याला 3 स्थानांचा फटका बसला आहे. शुबमन ताज्या आकडेवारीनुसार नवव्या स्थानी आहे. तर उपकर्णधार ऋषभ पंत सातव्या क्रमांकावरुन आठव्या स्थानी पोहचला आहे.