IND vs ENG | टीम इंडियाचा पराभव, मात्र जसप्रीत बुमराहला फायदा

Cricket News | टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धचा पहिला सामना गमवावा लागला. तर इंग्लंडने विजयी सलामी दिली. मात्र इंग्लंडला या विजयानंतरही कॅप्टन बेन स्टोक्सला धक्का लागलाय.

IND vs ENG | टीम इंडियाचा पराभव, मात्र जसप्रीत बुमराहला फायदा
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 5:13 PM

मुंबई | टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात सामन्यात शानदार कामगिरीनंतरही इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं. पहिल्या डावात 190 धावांची आघाडी घेतल्यानंतरही टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. इंग्लंडने विजयी सुरुवात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. ओली पोप आणि टॉम हार्टली हे दोघे इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. ओली पोप याने दुसऱ्या डावात 196 धावांची खेळी केली. तर टॉम हार्टलीने 7 विकेट्स घेत टीम इंडियाला गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. तसेच टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. यामध्ये जसप्रीत बुमराह याचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.

जसप्रीत बुमराहने एकूण 6 विकेट्स घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या. मात्र याचा टीम इंडियाला फायदा होऊ शकला नाही. मात्र बुमराहला याचा चांगला फायदा झाला आहे. आयसीसीने नुकतीच कसोटी रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये बुमराहला फायदा झालाय.

बुमराहने बॉलिंग रँकिंगमध्ये एका स्थानाची झेप घेतली आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याला मागे टाकलंय. बुमराह पाचव्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. बुमराहच्या नावावर 825 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. बुमराह व्यतिरिक्त टॉप 10 बॉलर्समध्ये टीम इंडियाच्या दोघांचा समावेश आहे. यामध्ये आर अश्विन आणि रवींद्र जडेजा आहे. आर अश्विन याने आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. तर जडेजा सहाव्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियाचा विराट कोहली फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे. विराट इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळला नाही. मात्र त्यानंतरही विराटला एक स्थानाचा फायदा झाला आहे. विराट सहाव्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा बाबर आझम याने 5 स्थानांची झेप घेत 10 व्या वरुन 5 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

आयसीसी टेस्ट रॅकिंग

ऑलराउंडरमध्ये नंबर 1 कोण?

अष्टपैलूंमध्येही टीम इंडियाचाच डंका आहे. रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे. तर आर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. शाकीब अल हसन तिसऱ्या आणि जो रुट चौथ्या क्रमांकावर आहे. हैदराबाद कसोटीतील कामगिरीच्या जोरावर रुटने बेन स्टोक्स याला मागे टाकलं आहे. अक्षर पटेल पाचव्यावरुन सहाव्या स्थानी आहे. तर पॅट कमिन्स 12 वरुन 9 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.