AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : दक्षिण अफ्रिका उपांत्य फेरी गाठणार का? बांगलादेशने नाणेफेक जिंकत निवडली…

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ब गटातील महत्त्वाचा सामना दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. हा सामना दक्षिण अफ्रिकेसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यातील निकाल उपांत्य फेरीचं गणित सोडवणार आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.

T20 World Cup : दक्षिण अफ्रिका उपांत्य फेरी गाठणार का? बांगलादेशने नाणेफेक जिंकत निवडली...
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 12, 2024 | 7:14 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 16 वा सामना बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. तसं पाहिलं तर बांगलादेशचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. कारण वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या संघांचे प्रत्येकी 4 गुण आहेत. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करायची असेल तर हा सामना जिंकावाच लागणार आहे. दरम्यान बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने सांगितलं की, ‘आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. संघासाठी बाउन्स बॅक करण्याची ही उत्तम संधी आहे. आम्ही विजयाने सुरुवात केली, पण गती कायम ठेवू शकलो नाही. आज आमच्या संघात एक बदल आहे.” दरम्यान, दुबईची खेळपट्टी ही खेळपट्टी फिरकीपटूंना संपूर्णपणे मदत करेल.

दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हीने सांगितलं की, “आम्हाला गोलंदाजी मिळाल्याचा आनंद झाला, आम्ही या गेममध्ये द्विधा मनस्थितीतून आलो होतो. गटात अजून बरेच क्रिकेट खेळायचे बाकी आहे, आम्हाला फक्त विजय हवा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही आज ते करू शकतो. विश्वचषक प्रत्येक क्रिकेटरमधील सर्वोत्तम गोष्टी समोर आणतो आणि मला आनंद आहे की मी योगदान देऊ शकलो. आमच्या संघात कोणतेही बदल नाहीत .”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश महिला (प्लेइंग इलेव्हन): दिलारा अक्टर, शाठी राणी, शोभना मोस्तरी, निगार सुलताना (विकेटकीपर कर्णधार), मुर्शिदा खातून, शोर्ना अक्टर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर, मारुफा अक्टर.

दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिझान कॅप, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान