AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs PAKW : ऋचाचा तडाखा-स्मृतीचं अर्धशतक, टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा, कोण जिंकणार पहिला सामना?

India vs Pakistan Womens 1st Innings Highlights : टीम इंडियाने आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. भारतासाठी स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी मोठी भागीदारी केली.

INDW vs PAKW : ऋचाचा तडाखा-स्मृतीचं अर्धशतक, टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा, कोण जिंकणार पहिला सामना?
Smriti Mandhana and Richa GhoshImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 14, 2026 | 9:39 PM
Share

सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाचं स्फोटक अर्धशतक आणि विकेटकीपर ऋचा घोष हीने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर वुमन्स टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात (Icc Womens T20i World Cup 2026) आपली तिसरी आणि पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 8.55 च्या रनरेट धावा कराव्या लागणार आहेत. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 170 रन्स केल्या. त्यामुळे आता टीम इंडिया विजयी सलामी देणार की पाकिस्तान मैदान मारणार? हे काही वेळातच स्पष्ट होईल.

टीम इंडियाची बॅटिंग

कर्णधार हरमनप्रीत कौर हीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाची सलामी जोडी अपेक्षित सुरुवात मिळवून देण्यात अपयशी ठरली. शफाली वर्मा 6 धावांवर आऊट झाली. तर जेमिमाह रॉड्रिग्स हीने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे टीम इंडियाची 3.4 ओव्हरमध्ये 2 आऊट 18 अशी स्थिती झाली.

स्मृती मंधाना -हरमनप्रीत कौरची विक्रमी भागीदारी

त्यानंतर ओपनर स्मृती मंधाना आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या जोडीने पाकिस्तान विरुद्ध टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी केली. या दोघींनी 91 धावांची भागीदारी केली. या दरम्यान स्मृतीने अर्धशतक झळकावलं. मात्र स्मृतीला अर्धशतकानंतर 18 धावाच जोडता आल्या. स्मृतीने 44 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 68 रन्स केल्या. त्यानंतर भारती फुलमाळी हीने निराशा केली. भारती 1 धाव करुन आऊट झाली. हरमनप्रीत कौर हीला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र हरमनप्रीत निर्णायक क्षणी आऊट झाली. हरमनप्रीतने 35 बॉलमध्ये 36 रन्स केल्या.

टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा

ऋचा घोषचा फिनिशिंग टच, 200 च्या स्ट्राईक रेटने धावा

त्यानंतर ऋचा घोष हीने दीप्ती शर्मा हीच्यासह फटकेबाजी केली. ऋचाने केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला 170 हा आकडा गाठता आला. ऋचाने 200 च्या स्ट्राईक रेटने 17 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. ऋचाने या खेळीत 1 सिक्ससह 5 चौकार लगावले. तर दीप्ती शर्मा (12)* आणि श्रेयांका पाटील (1)* धावा करुन नाबाद परतल्या. पाकिस्तानसाठी सादीया इक्बाल आणि कॅप्टन फातिमान सना या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना