
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धा रगंतदार स्थितीत पोहचली आहे. या स्पर्धेत एकूण 8 सघांनी प्रत्येकी किमान 5 सामने खेळले आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत गतविजेता ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या 3 संघांनी उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर उंपात्य फेरीतील एका जागेसाठी न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्याच जोरदार चुरस आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाचं उपांत्य फेरीतील आव्हान कायम राहिल. तर पराभूत संघातं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या स्पर्धेतील सहाव्या सामन्याआधी अडचणीत वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाची कॅप्टन एलिसा हीली हीला दुखापतीमुळे सहाव्या सामन्यात खेळता येणार नाहीय. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलिया या मोहिमेतील आपल्या सहाव्या सामन्यात 22 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे.
एलिसा हीली हीला गेल्या शनिवारी दुखापत झाली होती. एलिसाला सरावादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे एलिसा इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती टीम मॅनजमेंटकडून देण्यात आली आहे. तसेच एलिसाच्या फिटनेसकडेही लक्ष देण्यात येणार असल्याचंही टीम मॅनेजमेंटकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे एलिसा या मोहिमेतील आपला सातवा आणि शेवटचा सामना खेळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ऑस्ट्रेलिया साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. हा सामना 25 ऑक्टोबरला होणार आहे.
एलिसाच्या जागी आता इंग्लंड विरुद्ध नेतृत्व कोण करणार? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एलिसाच्या अनुपस्थितीत ताहलिया मॅक्ग्रा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच बेथ मुनी विकेटकीपर म्हणून खेळणार आहे. तसेच जॉर्जिया वोल हीला टॉप ऑर्डरमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान एलिसा हीली हीने या स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. एलिसाने 4 सामन्यांमध्ये 2 शतकांसह एकूण 294 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे एलिसाने हे 2 शतकं सलग लगावलीत. एलिसाने टीम इंडिया विरुद्ध 142 तर बांगलादेश विरुद्ध नाबाद 113 धावांची खेळी करत संघाला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती.