AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 | पाकिस्तान नेदरलँड्स विरुद्ध भिडणार, तरीही बाबरसेनेला कसली भीती सतावतेय?

Icc World Cup 2023 pakistan vs netherlands | पाकिस्तान क्रिकेट टीम काही दिवसांपूर्वी आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी होती. मात्र त्यांची घसरण झाली. आता वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. मात्र त्याआधी कॅप्टन बाबर आझम चिंतेत आहे.

World Cup 2023 | पाकिस्तान नेदरलँड्स विरुद्ध भिडणार, तरीही बाबरसेनेला कसली भीती सतावतेय?
| Updated on: Oct 05, 2023 | 11:15 PM
Share

हैदरबाद |नडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला पाणी पाजलं. न्यूझीलंडने इंग्लंडला 9 विकेट्सने पराभूत करत विजयी सुरुवात केली. आता त्यानंतर दुसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात होणार आहे. हा सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. नेदरलँड्स विरुद्ध सामना असल्याने पाकिस्तानला तसं फार काळजी करण्याचं कारण नाही. मात्र त्यानंतरही पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम हा टेन्शनमध्ये आहे. नक्की का हे आपण समजून घेऊयात.

आतापर्यंत आशिया कप 2023 स्पर्धेतील काही सामने पावसामुळे रद्द झालेत. तोच प्रकार वनडे वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात झाला. टीम इंडियाचे दोन्ही सराव सामने हे पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामन्याशिवाय खेळणार आहे. आता शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामन्यादरम्यान हवामान कसं असेल? सामन्यादरम्यान पाऊस होईल का हे आपण समजून घेऊयात.

हवामान कसं असेल?

हवामान खात्याच्या माहितीनुसार, शुक्रवारी हैदराबादमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. हैदराबादमध्ये ऊन असेल. त्यामुळे सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय होईल. मात्र सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात येईल. आता 1 पॉइंट मिळाला की पॉइंट्स टेबलमध्ये सेमी फायनल पात्रतेच्या समीकरणात हिशोब वेगळा होतो. 1 पॉइंटमुळे सर्व काही गणित बदलतं.त्यामुळे कॅप्टन बाबरला टेन्शन आहे.

नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन