AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRE vs IND : टीम इंडियात निवड झाल्यास Vaibhav Sooryavanshi याला मिळणार इतके लाख, आकडा किती?

Ireland vs India T20i Series 2026 : आयर्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीकडून टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी याचा या मालिकेनिमित्ताने पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.

IRE vs IND : टीम इंडियात निवड झाल्यास Vaibhav Sooryavanshi याला मिळणार इतके लाख, आकडा किती?
Vaibhav Sooryavanshi U19 Team IndiaImage Credit source: MB Media/Getty Images
| Updated on: Apr 14, 2026 | 9:28 PM
Share

आयपीएल स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखवून देण्याची संधी मिळाली. या स्पर्धेमुळे भारतासह विदेशातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं. इतकंच नाही तर खेळाडूंना प्रसिद्धीसह पैसाही मिळाला. जसप्रीत बुमराह, रिंकु सिंह या आणि आसारख्या असंख्य खेळाडूंना आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता आणखी एक भारताचा खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. अवघ्या 15 वर्षांचा असलेल्या वैभव सूर्यवंशी याने आयपीएल स्पर्धेत चाबूक कामगिरी केलीय. आता वैभवची अवघ्या काही महिन्यांनी टीम इंडियात निवड केली जाणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. या चर्चेनिमित्ताने वैभवची टीम इंडियात निवड झाल्यास त्याला किती पैसा मिळणार? हे आपण जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया यजमान आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेत उभयसंघात एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. आता वैभवची या मालिकेसाठी निवड झाल्यास त्याला मिळणारी रक्कम ही लाखोंच्या घरात असणार आहे

वैभवला आयर्लंड विरुद्ध भारतीय संघात संधी मिळाल्यास त्याला कोणत्याही स्थितीत 3 लाख रुपये मिळतील. तसेच वैभवला दोन्ही सामन्यांसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास त्याला 6 रुपये मिळतील. बीसीसीआयच्या नियमांनुसार, प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूला एका टी 20i सामन्यासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये मानधन दिलं जातं. तर प्लेइंग ईलेव्हनमध्ये नसलेल्या खेळाडूंना प्रत्येक टी 20i सामन्यासाठी दीड लाख रुपेय मानधन मिळतं.

वैभवची आयपीएल कारकीर्द

वैभव सूर्यवंशी याला वयाच्या 13 व्या वर्षी आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळालं. वैभवने 2025 साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं. वैभवचं यंदाचं हे आयपीएल स्पर्धेतील दुसरं वर्ष आहे. वैभवने आतापर्यंत एकूण 12 सामन्यांमध्ये 452 धावा केल्या आहेत. वैभवने या दरम्यान 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत.

टीम इंडियाचा आयर्लंड दौरा

दरम्यान टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याची 26 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 28 जून रोजी दौऱ्याची सांगता होणार आहे. वैभव सूर्यवंशी याची भारतीय संघात निवड झाल्यास तो सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा खेळाडू ठरेल. सर्वात कमी वयात 16 व्या वर्षी पदार्पण करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…