AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND-W vs ENG-W: भारतीय संघावर ‘ही’ इंग्लंडची खेळाडू पडली भारी, दमदार फलंदाजी करत खेचून आणला विजय, सामन्यासह मालिकेतही भारताचा पराभव

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीमध्ये इंग्लंडने विजय मिळवला. फलंदाजाच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला पराभव पत्करावा लागला.

IND-W vs ENG-W: भारतीय संघावर 'ही' इंग्लंडची खेळाडू पडली भारी, दमदार फलंदाजी करत खेचून आणला विजय, सामन्यासह मालिकेतही भारताचा पराभव
तिसऱ्या टी-20 सामन्यातील विजयासह मालिकाही इंग्लंड संघाने आपल्या नावे केली
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 7:17 PM
Share

लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघ (India Women Cricket Team) सध्या इंग्लंडच्या दौैऱ्यावर (England Tour) असून दौऱ्यातील शेवटचा सामना नुकताच पार पडला. एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिका भारत जिंकेल असे वाटत असतानाच अखेरचा सामना 8 विकेट्सने गमावल्यावर ही मालिकाही 2-1 ने भारताच्या हातातून निसटली आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये पुन्हा एकदा फलंदाजाच्या सुमार कामगिरीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. तर इंग्लंडकडून सलामीवीर डॅनी वायट (Danni Wyatt) भारताच्या सर्व गोलंदाजावर भारी पडली आणि तिने विजयश्री खेचून आणला.

सामन्यात सुरुवातीला भारताकडून सलामीवीर स्मृति मंधाना (Smriti Mandhana) हिने दमदार 70 धावांची खेळी केल्यामुळे भारत 153 धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवू शकला. पण इंग्लंडकडून डॅनी वायटने (Danni Wyatt) 89 धावांची तुफानी खेळी खेळत 19 व्या ओव्हरमध्येच संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या फलंदाजीचा विचार करता स्मृती सोडता कर्णधार हरमनप्रीत कौर (36) आणि रिचा घोष (20) यांच्याशिवायत कोणत्या फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर गोलंदाजीमध्ये दिप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवला. ज्यामुळे इंग्लंडने 8 विकेट्सनी दमदार विजय आपल्या नावे केला.

स्मृतिचं अर्धशतक तर डॅनीचंही चोख प्रतित्यूत्तर

भारताकडून स्मृति मंधानाने दमदार अर्धशतक लगावला. तिने 51 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार ठोकत 70 धावा केल्या. तिच्या या उत्कृष्ठ खेळीमुळे सामन्यात भारताचा थोडाफार निभाव लागला. पण इंग्लंडकडूनही डॅनी वायटने जशास तसे उत्तर देत नाबाद 89 धावांची खेळी केली. डॅनीने 56 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकार खेचत 89 धावा केल्या आणि इंग्लंडला सामना जिंकवून देत प्लेयर ऑफ द मॅचचा खिताबही पटकावला.

हे ही वाचा :

भारतीय संघात कोरोनाची एन्ट्री, 2 खेळाडू पॉझिटिव्ह, इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी चिंता वाढल्या!

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेटपटू सज्ज, सामन्यांपूर्वी ‘ही’ चाचणी अनिवार्य

(In 3rd T 20 England women beat Indian Women by 8 Wickets with Danni Wyatt Knock Won series with 2-1)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.