IND vs AUS A: रोहित-विराटला डच्चू, श्रेयस अय्यर कॅप्टन, ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजासाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला संधी?
India A vs Australia A One Day Series 2025 : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेतील सलामीचा सामना 30 सप्टेंबरला होणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

टीम इंडियाने बुधवारी 24 सप्टेंबरला बांगलादेशला पराभूत करत आशिया कप 2025 स्पर्धेत सलग पाचवा विजय मिळवला. भारताने या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर काही तासांनी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने गुरुवारी 25 सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या 3 मॅचच्या वनडे सीरिजसाठी इंडिया ए टीमची घोषणा केली आहे. या मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तसेच युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याचाही समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
तसेच या मालिकेसाठी इंडिया ए टीममध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीचा समावेश केलेला नाही. ही जोडी ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी इंडिया एकडून खेळणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या दोघांना संधी मिळाली नाही. सध्या ऑस्ट्रेलिया ए टीम भारत दौऱ्यावर आहे. उभयसंघात एकूण 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येत आहे. त्यानंतर उभयसंघात 30 सप्टेंबरपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने हे कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये होणार आहेत. या सामन्यांना दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. एकाच मैदानात तिन्ही सामने होणार असल्याने खेळाडूंचा प्रवासाचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.
अभिषेक शर्माचा समावेश
टीम इंडिया सध्या आशिया कप 2025 स्पर्धेत खेळत आहेत. आशिया कप स्पर्धेत खेळत असलेल्या बहुतांश खेळाडूंना ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या मालिकेत निवड करण्यात आली आहे. मात्र आशिया कपमुळे काही खेळाडूंना ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या पहिल्या सामन्यात काही खेळाडूंना खेळता येणार नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि अर्शदीप सिंह या तिघांना संधी देण्यात आलेली नाही. हे तिघे आशिया कप फायनलनंतर इंडिया ए टीमसह जोडले जाणार आहेत. तसेच इंडिया ए टीममध्ये आयुष बदोनी, रवी बिश्नोई आणि अभिषेक पोरेल यांना इंडिया ए टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
3 सामने आणि 1 मालिका, इंडिया ए टीम जाहीर
🚨 NEWS 🚨
India A and Rest of India squads announced.
Details 🔽https://t.co/dxKoR98VzX
— BCCI (@BCCI) September 25, 2025
पहिल्या सामन्यासाठी इंडिया ए टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधु, गुरजापनीत सिंग, युद्धवीर सिंह, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), प्रियांश आर्य आणि सिमरजीत सिंह.
दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यासाठी इंडिया ए टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधु, गुरजापनीत सिंग, युद्धवीर सिंह, रवि बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह.
