AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : 6,6,6,6,6, अभिषेक शर्मा नवा सिक्सर किंग, रोहितसह एका झटक्यात चौघांना पछाडलं, आशिया कपमध्ये मोठा रेकॉर्ड

Abhishek Sharma Record : अभिषेक शर्मा याने बांगलादेश विरुद्ध 75 धावांची वादळी खेळी करत टीम इंडियाला अप्रतिम सुरुवात करुन दिली. अभिषेकने या खेळीसह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

IND vs BAN : 6,6,6,6,6, अभिषेक शर्मा नवा सिक्सर किंग, रोहितसह एका झटक्यात चौघांना पछाडलं, आशिया कपमध्ये मोठा रेकॉर्ड
Abhishek Sharma Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Sep 25, 2025 | 1:16 AM
Share

टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याला मोठी खेळी करण्यापासून रोखणं गोलंदांजांसाठी आव्हानात्मक ठरु लागलं आहे. अभिषेक टी आशिया कप 2025 स्पर्धेत बांगलादेश विरुद्धही आपला झंझावात कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. अभिषेकने पाकिस्तान विरुद्ध रविवारी 21 सप्टेंबर रोजी विजयी धावांचा पाठलाग करताना 74 धावा केल्या होत्या. त्यानंतर अभिषेकने आता 24 सप्टेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाच्या सुपर 4 मधील दुसऱ्या सामन्यामध्ये सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. अभिषेकने 200 च्या स्ट्राईक रेटने बांगलादेश विरुद्ध 25 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. अभिषेकने बांगलादेश विरुद्ध एकूण 75 धावा केल्या. अभिषेकने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला. अभिषेक आशिया कप स्पर्धेतील नवा सिक्सर किंग ठरला.

अभिषेकने बांगलादेश विरुद्ध संयमी सुरुवात केली. अभिषेकने पहिल्या 9 बॉलमध्ये 9 रन्स केल्या. मात्र अभिषेकने ठराविक वेळेनंतर गिअर बदलला. अभिषेकने त्यांनतर मागे वळून पाहिलं नाही. अभिषेकने मैदानात चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांना झोडलं. अभिषेकने अशाप्रकारे 36 बॉलमध्ये नॉट आऊट 75 रन्स केल्या होत्या . त्यामुळे अभिषेक सहज शतक करेल, असं वाटत होतं. मात्र अभिषेक कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या चुकीच्या कॉलवर रन आऊट झाला. अशाप्रकारे अभिषेकच्या खेळीचा शेवट झाला. अभिषेकने 37 बॉलमध्ये 6 फोर आणि 5 सिक्ससह 75 रन्स केल्या.

अभिषेकने या 75 धावांच्या खेळीसह एका झटक्यात अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. अभिषेकने 1-2 नाही तर तब्बल चौघांना मागे टाकत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सूर्या एका आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावणारा पहिल फलंदाज ठरला आहे. अभिषेकने श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांचा एका आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच अभिषेकने रोहित शर्मा, शाहिद आफ्रिदीसह रहमानुल्लाह गुरुबाझ या तिघांना मागे टाकलं.

आशिया कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक सिक्स

  1. रहमानुल्लाह गुरुबाझ : 12 सिक्स, 2022
  2. शाहिद आफ्रिदी : 12 सिक्स, 2010
  3. रोहित शर्मा, 13 सिक्स, 2018
  4. सनथ जयसूर्या, 14 सिक्स, 2008
  5. अभिषेक शर्मा, 17 सिक्स, 2025

दरम्यान अभिषेकच्या नावावर या सामन्याआधी आशिया कप स्पर्धेतील एका हंगामात 12 सिक्सची नोंद होती. मात्र अभिषेकने या 5 सिक्ससह पाचव्या स्थानावरुन थेट पहिल्या स्थानी झेप घेतली.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.