AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन चेंडूवर तीन वेळा झाली दुखापत, पंत दुखापतीने कळवळला! दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार की नाही?

IND-A vs SA-A: इंडिया ए आणि दक्षिण अफ्रिका ए सामन्याच्या तिसरा दिवस भारतीय कर्णधार ऋषभ पंतसाठी काही चांगला गेला नाही. त्याला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज त्शेपो मोरेकीच्या गोलंदाजीवर त्याला दुखापत झाली.

तीन चेंडूवर तीन वेळा झाली दुखापत, पंत दुखापतीने कळवळला! दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार की नाही?
तीन चेंडूवर तीन वेळा झाली दुखापत, पंत दुखापतीने कळवळला! दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार की नाही?Image Credit source: PTI
| Updated on: Nov 08, 2025 | 4:00 PM
Share

ऋषभ पंत आणि दुखापत आता एक समीकरणच तयार झालं आहे. ऋषभ पंत मोठ्या अपघातातून सावरून मैदानात परतला. पण त्याचं आणि दुखापतीचं शुक्लकाष्ठ काही संपलेलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पायाचं बोट फ्रॅक्चर झालं होतं. त्यानंतर तीन महिने मैदानापासून दूर होता. आता दक्षिण अफ्रिका ए संघाविरूद्धच्या अनौपचारिक कसोटी मालिकेतून पदार्पण केलं. तसेच दक्षिण अफ्रिकेच्या कसोटी मालिकेत कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात त्याची निवड झाली. पण दक्षिण अफ्रिका ए विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा केएल राहुल लगेच बाद झाला आणि तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला आणि आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. पण त्याची फंलदाजी फार काही चालली नाही. कारण तीन चेंडूवर तीन वेळा दुखापत झाली आणि तंबूत परतण्याशिवाय पर्याय उरला नाही. यावेळी पंत दुखापतीने कळवळत होता.

ऋषभ पंतला दुखापत कशी झाली?

दक्षिण अफ्रिका ए संघाकडून वेगवान गोलंदाज त्शेपो मोरेकीच्या तीन चेंडूंवर तीन वेळा दुखापत झाल्याने पंतला कळवळला. पहिला चेंडू हेल्मेटवर लागला. त्यानंतर काही वळात त्शेपो मोरेकीचा एक चेंडू डाव्या हाताच्या कोपऱ्याला लागला. त्यानंतर पंतने खेळ सुरुच ठेवला. मात्र तिसऱ्या चेंडू लागला आणि पंतला मैदान सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही.वेदना कायम राहिल्यामुळे पंतला दोन वैद्यकीय विश्रांतीनंतर रिटायर हर्ट करावे लागले. ऋषभ पंत 22 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारून 17 धावा करत रिटायर हर्ट झाला.

ऋषभ पंतची दुखापत किती गंभीर आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. पण क्रीडा चाहत्यांची चिंता मात्र वाढली आहे. कारण आता दुखापतीतून सावरून मैदानात परतला होता. पंतच्या दुखापतीबद्दल सध्या बीसीसीआयकडून अपडेटची वाट पाहिली जात आहे. ऋषभ पंतची दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात निवड केली आहे. पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून, तर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे पंतची दुखापत किती गंभीर आहे आणि कसोटी मालिकेसाठी तंदुरूस्त होईल का? याकडे लक्ष असणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!