IND vs ENG : भारताने सीरीज जिंकली, गेल्या 8 वर्षांत इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकणारा भारत हा एकमेव दुसरा संघ, सर्व रेकॉर्ड्स जाणून घ्या…

भारतानं 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून इंग्लंडविरुद्ध आठ पांढऱ्या चेंडूंची मालिका खेळली. यापैकी इंडियाने 7 मालिका जिंकल्या. 2018 मध्ये इंग्लंडनं घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत भारताला 2-1 नं पराभूत केलं होतं.

IND vs ENG : भारताने सीरीज जिंकली, गेल्या 8 वर्षांत इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकणारा भारत हा एकमेव दुसरा संघ, सर्व रेकॉर्ड्स जाणून घ्या...
भारताने सीरीज जिंकलीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 8:11 AM

IND vs ENG 3rd ODI : काल मँचेस्टरच्या ओल्डट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या वनडेत ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या (Hardik pandya) भारताच्या विजयाचे नायक ठरले. भारताने इंग्लंडचा (IND vs ENG) पाच विकेटने पराभव केला.  ऋषभ पंतने (Rishabh Pant) शानदार सेंच्युरी झळकावली. त्याने 113 चेंडूत नाबाद 125 धावा केल्या. यात 16 चौकार आणि दोन षटकार आहेत. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 260 धावांचे लक्ष्य भारताने 42.1 षटकात पूर्ण केलं. भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. शेवटच्या वनडेत टीम इंडियानं पाच विकेट्स राखून विजय मिळवला. भारताकडून ऋषभ पंतने शानदार शतक झळकावलं. त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीनं चाहत्यांची मनं जिंकली. या विजयासह भारतानं अनेक विक्रमही आपल्या नावावर केलेत.

टीम इंडिया 2015 पासून गेल्या आठ वर्षांत द्विपक्षीय वनडे मालिका जिंकणारा इंग्लंडमधील दुसरा संघ आहे. यादरम्यान इंग्लंडने सात संघांविरुद्ध 15 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळली आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये इंग्लंडचा 3-2 आणि 2020 मध्ये 2-1 असा पराभव केला होता.

2015 पासून मायदेशात इंग्लंडचा पराभव

  1. ऑस्ट्रेलियानं 2015 मध्ये मालिका 3-2 नं जिंकली होती
  2. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियानं 2-1 नं मालिका जिंकली होती
  3. हे सुद्धा वाचा
  4. भारतीय संघानं 2022 मध्ये मालिका 2-1 नं जिंकली होती

भारतीय संघानं 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून इंग्लंडविरुद्ध आठ पांढऱ्या चेंडूंची मालिका (ODI आणि T20) खेळली आहे. यापैकी टीम इंडियाने सात मालिका जिंकल्या. केवळ 2018 मध्ये इंग्लंडनं घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत भारताला 2-1 नं पराभूत केलं होतं. उर्वरित सात मालिका भारतानं घरच्या मैदानावर आणि इंग्लंडमध्ये जिंकल्या आहेत.

वनडे

वर्ष, यजमान देश, मालिका निकाल

  1. 2017 – भारत – भारत 2-1 ने जिंकला
  2. 2018 – इंग्लंड – इंग्लंडने 2-1 ने विजय मिळवला
  3. 2021 – भारत – भारत 2-1 ने जिंकला
  4. 2022 – इंग्लंड – भारत 2-1 ने जिंकला

T20

वर्ष, यजमान देश, मालिका निकाल

  1. 2017 – भारत –  भारत 2-1 ने जिंकला
  2. 2018-  इंग्लंड – भारत 2-1 ने जिंकला
  3. 2021 – भारत – भारताने 3-2 असा विजय मिळवला
  4. 2022 – इंग्लंड – भारत 2-1 ने जिंकला

भारतानं आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध 11 मालिका जिंकल्या आहेत. मात्र, इंग्लंडच्या भूमीवर टीम इंडियाचा हा चौथा एकदिवसीय मालिका विजय आहे. यामध्ये 1986 मध्ये 1-1 असा ड्रॉ देखील समाविष्ट होता. ज्यामध्ये भारताला विजेता घोषित करण्यात आलं. भारतीय संघ आठ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकू शकला. टीम इंडियाने शेवटची वेळ 2014 मध्ये इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका 3-1 ने जिंकली होती. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिन्ही फॉरमॅट एकत्र करून सलग सातवी मालिका जिंकली आहे. यादरम्यान भारतानं घरच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा नंतर टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा, कसोटी आणि टी-20 मालिकेत श्रीलंकेचा आणि त्यानंतर टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा पराभव केला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.