AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 3rd T20: Suryakumar Yadav खाली पडला, पण SIX मारली, पहा VIDEO

IND vs SL 3rd T20: सेंच्युरी मारणाऱ्या सूर्यकुमार यादवने काही क्लासिक शॉट्स मारले. स्कूप SIX तर लाजवाब होता, VIDEO

IND vs SL 3rd T20: Suryakumar Yadav खाली पडला, पण SIX मारली, पहा VIDEO
Suryakumar-yadavImage Credit source: AFP
| Updated on: Jan 08, 2023 | 9:18 AM
Share

राजकोट: वर्ष बदललय. पण सूर्युकमार यादवचा फॉर्म, बॅटिंगची स्टाइल तीच आहे. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादवचा 2022 चा फॉर्म कायम आहे. त्याने शनिवारी राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या T20 सामन्यात तुफानी शतक ठोकलं. सूर्याने फक्त 45 चेंडूत T20 करिअरमधील तिसरं शतक ठोकलं. 6 महिन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने ठोकलेलं हे तिसर शतक आहे. T20 मध्ये भारतासाठी तीन शतकं ठोकणारा सूर्यकुमार यादव दुसरा फलंदाज बनलाय. कालच्या सामन्यात सूर्याने काही लाजवाब फटके मारले. एका फटका खेळताना सूर्या जमिनीवर पडला पण त्याने सिक्स मारला.

तिसऱ्या सामन्यात फुल फॉर्ममध्ये

2022 च्या वर्षात T20 इंटरनॅशनलमध्ये सूर्यकुमार यादवने एकहजारपेक्षा जास्त धावा केल्या. 2023 ची सुरुवात सूर्यकुमार यादवसाठी चांगली झाली नव्हती. मुंबईत पहिल्या T20 सामन्यात तो स्वस्तात बाद झाला होता. पण सूर्याला पुनरागमन करायला फार वेळ लागला नाही. त्याने पुण्यात दुसऱ्या T20 सामन्यात वेगवान अर्धशतक झळकावलं. तिसऱ्या सामन्यात सूर्या फुल फॉर्ममध्ये आला होता. त्याने श्रीलंकेची चांगलीच धुलाई केली.

खाली पडून पण Suryakumar Yadav ने कसा स्कूप SIX मारला, ते इथे क्लिक करुन या VIDEO मध्ये पाहा

रोहितनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

श्रीलंकेविरुद्धची सीरीज 1-1 अशी बरोबरीत होती. सीरीज जिंकण्यासाठी अखेरच्या टी 20 सामन्यात फलंदाजांकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती. सूर्याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. राजकोटमध्ये डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्याने फार वेळ घेतला नाही. तिसरा चेंडू बाऊंड्री पार पोहोचवून आपला इरादा जाहीर केला. सूर्याने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अखेरच्या 5 ओव्हर्समध्ये शतक झळकावलं.

सूर्याने फक्त 45 चेंडूत शतक ठोकलं. टी 20 इंटरनॅशनलमध्ये रोहित शर्मानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय आहे. रोहितने फक्त 35 चेंडूत शतक झळकावलं होतं. या फॉर्मेटमध्ये तीनपेक्षा जास्त सेंच्युरी मारणारा दुसरा भारतीय आहे. 6 महिन्याात दुसरं शतक

सूर्यकुमार यादव 45 वा T20 इंटरनॅशनल सामना खेळतोय. सूर्याच 6 महिन्यातील हे तिसरं टी 20 शतक आहे. 10 जुलै 2022 रोजी इंग्लंड विरुद्ध नॉटिंघममध्ये त्याने पहिलं टी 20 शतक झळकावलं होतं. सूर्याने या मॅचमध्ये 117 धावा फटकावल्या होत्या. 20 नोव्हेंबर 2022 रोजी माउंट माउनगानुई येथे न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 111 धावा फटकावून दुसरं शतक झळकावलं होतं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.