
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजवर मात केली. टीम इंडियाने विंडीजवर 5 विकेट्सने विजय मिळवला. यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघाने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. टीम इंडिया 5 मार्चला उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचेल. मात्र उपांत्य फेरीतील या सामन्याआधी बीसीसीआयने सोमवारी अर्थात 2 मार्चला मोठी घोषणा केली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. बीसीसीआयने अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने केलेल्या सोशल मीडिया पोस्टनुसार अफगाणिस्तान क्रिकेट टीम जून महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 1 कसोटी सामना आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.
या निमित्ताने उभयसंघात पहिल्यांदा एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. आतापर्यंत उभयसंघात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात मालिका खेळवण्यात आलेली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या मालिकेची प्रतिक्षा असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 6 ते 10 जून दरम्यान चंडीगडमध्ये एकमेव टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील हा दुसराच कसोटी सामना असणार आहे. याआधी दोन्ही संघात 2018 साली एकमेव आणि पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता.
अफगाणिस्तानचा भारत दौरा
🚨 News 🚨
Here’s a look at the schedule for Afghanistan Men’s Team’s tour of India in June 2026 🗓️
Details ▶️ https://t.co/OkJVip4AhJ#TeamIndia | #INDvAFG pic.twitter.com/CQhIliTf2E
— BCCI (@BCCI) March 2, 2026
तसेच अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिज निमित्ताने टीम इंडियाच्या चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. रोहित आणि विराट या दोघांनी टी 20I आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तेव्हापासून दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे मॅचेसच खेळतात.
दरम्यान अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत शुबमन गिल हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. शुबमन गिल याच्याकडेच भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
एकमेव कसोटी सामना, 6 ते 10 जून, चंडीगड
पहिला सामना, 14 जून, धर्मशाला
दुसरा सामना, 17 जून, लखनौ
तिसरा सामना, 20 जून, चेन्नई