AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : बुधवारी डबल धमाका, भारत-अफगाणिस्तानमध्ये 2 सामने, चाहत्यांसाठी पर्वणी

Indian Cricket Team: बुधवारी 17 जून रोजी भारताचे 3 क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 2 सामने होणार आहेत. या तिन्ही सामन्यांबाबत जाणून घ्या.

Team India : बुधवारी डबल धमाका, भारत-अफगाणिस्तानमध्ये 2 सामने, चाहत्यांसाठी पर्वणी
India vs Afghanistan CricketImage Credit source: PTI/ACB
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 16, 2026 | 10:00 PM
Share

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार पाहायला मिळत आहे. इंग्लंडमध्ये वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी झाले आहेत. वुमन्स टीम इंडियाने या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारतीय पुरुष संघ मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. तर इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी सध्या पर्वणी आहे. अशात बुधवार 17 जून ही तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तब्बल 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. या 2 सामन्यांबाबत जाणून घेऊयात.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए

तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि टीम इंडिया यांच्यात ट्राय सीरिज खेळवण्यात येत आहे. इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे.

दुसरा सामना केव्हा?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसर्‍या सामन्यात सिनिअर टीम आमनेसामने असणार आहे. टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध शुबमन गिल याच्या नेतृत्वात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. उभयसंघातील ही पहिलीच एकदिवसीय द्विपक्षीय मालिका आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे भारतीय संघ सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

भारताने सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला होता. पावसाने खोडा घातल्याने हा सामना 50 ऐवजी 25 ओव्हरचा करण्यात आला. भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.

वुमन्स इंडिया-नेदरलँड्स सामना

दरम्यान वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया आपल्या मोहिमेतील दुसरा सामना बुधवारी 17 जूनला खेळणार आहे. वुमन्स टीम इंडियासमोर या क्रिकेट सामन्यात नेदरलँड्सचं आव्हान असणार आहे. हरमनप्रीत कौर भारताचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.  तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. त्यामुळे बुधवारी भारतीय संघ एकूण 3 पैकी किती सामने जिंकण्यात यशस्वी ठरणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना असणार आहे.

Follow Us
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार