AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus 1st Test : Mohammed Shami चा घातक चेंडू, वॉर्नरची दांडी गुल, अरे बापरे किती लांब उडाला स्टम्प VIDEO

Ind vs Aus 1st Test : आज ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्यासाठी पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावाची अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाही. सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले आहेत.

Ind vs Aus 1st Test : Mohammed Shami चा घातक चेंडू, वॉर्नरची दांडी गुल, अरे बापरे किती लांब उडाला स्टम्प VIDEO
Mohammed Shami to David WarnerImage Credit source: BCCI
| Updated on: Feb 09, 2023 | 10:38 AM
Share

Ind vs Aus 1st Test : नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. दोन्ही टीम्समध्ये एकूण चार कसोटी सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असं या सीरीजच नाव आहे. WTC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही सीरीज टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण ऑस्ट्रेलियाला या कसोटी मालिकेत हरवल्यास टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळता येईल. त्यामुळे टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. आज ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्यासाठी पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावाची अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाही. सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावले आहेत.

हे दोन्ही विकेटस टीम इंडियासाठी महत्त्वाचे होते

उस्मान ख्वाजा आणि डेविड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाचे दोन्ही भरवशाचे ओपनर मैदानात उतरले होते. दोघांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या अनेक कसोटी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले, तर मोठी खेळी उभारु शकतात. त्यामुळे हे दोन्ही विकेटस टीम इंडियासाठी महत्त्वाचे होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातही तशीच केली.

मोहम्मद शमीच्या क्लासिक बॉलवर डेविड वॉर्नर कसा बोल्ड झाला, ते इथे क्लिक करुन एकदा पाहा

सिराजकडून पहिला धक्का

दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने जबरदस्त ओपनर उस्मान ख्वाजाला पायचीत पकडलं. उस्मान ख्वाजा 3 चेंडूत अवघ्या 1 रन्सवर बाद झाला. अवघ्या 2 रन्सवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली.

डेविड वॉर्नरला काहीच करता आलं नाही

त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये डेविड वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतला. धोकादायक डेविड वॉर्नरला मोहम्मद शमीने क्लीन बोल्ड केलं. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शमीने ही विकेट काढली. त्याने अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. डेविड वॉर्नरला काहीच करता आलं नाही. त्याने डिफेन्स करण्यासाठी बॅट पुढे आणली. पण तो पर्यंत स्टम्पस उडालेले होते. या चेंडूचा वेग इतका होता की, स्टम्प लांबलचक उडाला. 2 रन्सवर 2 विकेट अशी ऑस्ट्रेलियाची स्थिती झाली. वॉर्नरने 5 बॉलमध्ये अवघी एक धाव केली. खेळपट्टी फिरकीला अनुकूल

आता मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथची जोडी मैदानात आहे. ऑस्ट्रेलियासमोर मुख्य आव्हान फिरकीच आहे. नागपूरची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. तिसऱ्या, चौथ्या दिवसापासून या विकेटवर बॅटिंग करणं सोपं नसेल. चेंडू वळायला लागल्यानंतर भारतीय गोलंदाज अधिक घातक बनू शकतात.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.