
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंनी राडा केला आहे. युवा खेळाडू शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या तुफानी शतकाच्या जोरावर भारताने 50 ओव्हर्समध्ये 399 धावांचा डोंगर उभा केला आहे. दोघांच्या शोनंतर कर्णधार के. एल. राहुल यानेही अर्धशतक करत महत्त्वाची खेळी केली. या सामन्यामध्ये के. एल. राहुलने स्टेडिअमच्या बाहेर खडे खडे सिक्स मारला. बॉल थेट स्टेडिअमच्या पत्र्यांवर गेलेला दिसला.
Madness by KL Rahul…!!!
– A six outside of Indore stadium. pic.twitter.com/5IErc9RKT3
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2023
कॅमेरॉन ग्रीन याच्या ओव्हरमध्ये राहुलने तिसऱ्या चेंडूवर बाहुबली सिक्सर मारला. स्टेडिअम बाहेर गेलेला हा सिक्स तब्बल 94 मीटर इतका दूर गेला होता. राहुलने या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी केली, कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणारा राहुलने 52 धावा केल्या.
भारताने फलंदाजी करताना 50 ओव्हर्समध्ये 399 धावा केल्या, यामध्ये शुबमन गिल 104 धावा (6 चौकार, 4 षटकार), श्रेयस अय्यर 105 धावा (11 चौकार 3षटकार), के. एल. राहुल 52 धावा, ईशान किशन 31 धावा आणि सूर्यकुमार यादव याच्या नाबाद 72 धावा (6 चौकार, 6षटकार) केल्या. ऑस्ट्रिलिया संघाकडून ग्रीन याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, वन डे मालिकेमधील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. हा सामना जिंकत बरोबरी साधण्यासाठी कांगारू पुरेपूर प्रयत्न करतील.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ (C), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (W), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W/C), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा