
भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार शुबमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्याने टीम इंडियावरील दबाव वाढला होता. शुबमन गिल 9 धावांवर बाद झाला आणि विराट कोहलीला सलग दुसऱ्यांदा खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे भारतीय संघाचा डाव रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी मळून 136 चेंडूत 118 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच भारताला 264 धावांपर्यंत मजल मारता आली. रोहित शर्माने या सामन्यात 97 चेंडूत 73 धावांची खेळी केली, तर श्रेयस अय्यरने 61 धावा केल्या. पण रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धावांसाठी दोघांमध्ये तू तू मै मै झाल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात
जोश हेझलवूडच्या गोलंदावरी रोहित शर्माने बचावात्मक शॉट खेळला. तेव्हा नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने धाव घेण्यास मनाई केली. त्यानंतर रोहित शर्मा संतापला आणि एक धाव घ्यायला हवी होती हे समजवून सांगितलं. स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झालेली चर्चा ऐकता असं वाटतं की चर्चा कमी आणि वादच जास्त झाला आहे. अय्यर जेव्हा मैदानात उतरला तेव्हा भारताने 17 धावांवर दोन गडी गमावले होते. पण त्यानंतर दोघांनी संघाचा डाव सावरला.
Stump mic captures Rohit Sharma vs Shreyas Iyer 🤣🙌
Whose call was it really?✍🏻👇#AUSvIND 👉 2nd ODI | LIVE NOW 👉 https://t.co/dfQTtniylt pic.twitter.com/YipS5K9ioa
— Star Sports (@StarSportsIndia) October 23, 2025
भारताने ऑस्ट्रेलिया विजयासाठी 265 दावांचं आव्हान दिलं आहे. मात्र हा सामना भारताच्या हातातून निसटत चालला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांना फोडून काढलं आहे. त्यामुळे आता हा सामना जिंकणं कठीण दिसत आहे. भारताने हा सामना गमावला तर मालिकाही हातातून जाईल. तीन सामन्यांची वनडे मालिका ऑस्ट्रेलिया 2-0 ने जिंकेल.