AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत पाकिस्तानचा भ्रमाचा भोपळा फुटला, भारताला झाला फायदा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा निकाल लागला आणि पाकिस्तानचा भ्रमाचा भोपळा फुटला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत पाकिस्तानचा भ्रमाचा भोपळा फुटला, भारताला झाला फायदा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत पाकिस्तानचा भ्रमाचा भोपळा फुटला, भारताला झाला फायदाImage Credit source: SA/ICC/BCCI Cricket Twitter
| Updated on: Oct 23, 2025 | 4:05 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दक्षिण विरूद्धच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून पाकिस्तानने मोठी झेप घेतली होती. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला पहिल्या कसोटीत 93 धावांनी पराभूत केलं होतं. या विजयासह 100 टक्के विजयी टक्केवारीसह पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियासोबत पहिल्या स्थानावर बसला होता. मात्र हा भ्रमाचा भोपळा 8 दिवसातच फुटला. दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तानने दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 गडी राखून पराभूत केलं. दक्षिण अफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करत विजयाचं खांत खोललं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना गमावला आणि टॉप 2 संघातून बाहेर पडला. तर टीम इंडियाला जबरदस्त फायदा झाला असून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर पाकिस्तानचा संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर इंग्लंडचं नुकसान झालं आहे.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले असून तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. याह विजयी टक्केवारी 100 असून पहिल्या स्थानावर आहे. श्रीलंकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एक सामना जिंकला, तर एक सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे 66.67 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने एकूण 7 कसोटी सामने खेळले असून 4 सामन्यात विजय, 2 सामन्यात पराभूत, तर एक सामना ड्रॉ झाला होता. यासह भारताची विजयी टक्केवारी ही 61.90 असून तिसऱ्या स्थानावर आहे.

दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका बरोबरीत सुटल्याने दोघांची विजयी टक्केवारी ही 50 असून संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेनंतर इंग्लंडला धक्का बसला आहे. इंग्लंडने पाच कसोटी सामने खेळले असून दोन सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला. त्यात इंग्लंडला -2 गुणांची पॅनेल्टी लागली आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 43.33 टक्के असून सहाव्या स्थानी आहे.

बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर असून दोन सामन्यापैकी एक सामना गमावला तर एक सामना ड्रॉ झाला. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 16.67 असून सातव्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा संघ आठव्या स्थानावर असून त्यांनी आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिजचा संघ सर्वात शेवटच्या स्थानी असून 5 पैकी 5 सामने गमावले आहेत. त्यांची विजयी टक्केवारी ही शून्य आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...