AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Jadeja : 50 वर्षात अशी कमाल करणारा जाडेजा दुसरा बॉलर, त्याच्या बेस्ट परफॉर्मन्सने ऑस्ट्रेलियाची हालत खराब

IND vs AUS 2nd Test : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्याडावात जाडेजाची जादू चालली. त्याने आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. ऑस्ट्रेलियाच्या एक-दोन नव्हे, तब्बल सात बॅटसमन्सना त्याने तंबूत पाठवलं.

Ravindra Jadeja : 50 वर्षात अशी कमाल करणारा जाडेजा दुसरा बॉलर, त्याच्या बेस्ट परफॉर्मन्सने ऑस्ट्रेलियाची हालत खराब
पडत्या काळात तसं वागणाऱ्यांना रविंद्र जडेजानं सुनावलं, नागपूर कसोटीनंतर काढली भडासImage Credit source: PTI
| Updated on: Feb 19, 2023 | 12:56 PM
Share

IND vs AUS 2nd Test : भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 धावात आटोपला. यात रविंद्र जाडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्याडावात जाडेजाची जादू चालली. त्याने आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. ऑस्ट्रेलियाच्या एक-दोन नव्हे, तब्बल सात बॅटसमन्सना त्याने तंबूत पाठवलं. जाडेजाने दुसऱ्याडावात 12.1 ओव्हर्समध्ये 42 धावा देऊन 7 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये रवींद्र जाडेजाच हे करिअरमधील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. याआधी रवींद्र जाडेजाने 48 धावा देऊन 7 विकेट काढल्या होत्या. 2016 साली इंग्लंड विरुद्ध चेन्नई कसोटीत जाडेजाने हे प्रदर्शन केलं होतं.

50 वर्षात दुसऱ्यांदा असं घडलं

जाडेजाने दिल्ली कसोटीच्या दुसऱ्याडावात सात विकेट काढले. त्यात पाच बॅट्समनना क्लीन बोल्ड केलं. मागच्या 50 वर्षात दुसऱ्यांदा असं झालय, जेव्हा कुठल्या स्पिनरने 5 बॅट्समनना एका इनिंगमध्ये बोल्ड केलय. याआधी अनिल कुंबळेने 1992 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये अशी कामगिरी केली होती. वेगवान बॉलर्समध्ये पाकिस्तानचा शोएब अख्तर अशी कामगिरी करणारा शेवटचा बॉलर आहे. त्याने 2002 साली न्यूझीलंड विरुद्ध लाहोरमध्ये असं यश मिळवलं होतं.

चालू सीरीजमध्ये जाडेजाने किती विकेट काढल्यात?

दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्ससह जाडेजाने बाद केलेल्या एकूण विकेटची संख्या 10 झाली आहे. त्याने 110 धावा दिल्या. जाडेजाने दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात 3 विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालू बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या दोन कसोटीत जाडेजाने एकूण 17 विकेट काढल्यात. 2 वेळा त्याने 5 पेक्षा जास्त विकेट काढल्यात. दिल्ली कसोटीत 10 विकेट घेण्याआधी त्याने नागपूर कसोटीत 7 विकेट घेतल्या होत्या. आता ही भिती खरी ठरलीय

फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा जाडेजाने पुरेपूर फायदा उचलला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियने टीमने थोडा सरस खेळ दाखवला होता. ती कसर टीम इंडियाने दुसऱ्याडावात भरून काढली. टेस्ट सीरीज सुरु होण्याआधी जाडेजा भारी पडेल अशी ऑस्ट्रेलियन टीममध्ये भिती होती. आता ही भिती खरी ठरलीय. जाडेजाला कसं खेळायच? या प्रश्नाच अजूनतरी ऑस्ट्रेलियन टीमला उत्तर सापडलेलं नाही. उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्येही जाडेजाच्या फिरकीच ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान असेल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.