IND vs AUS Test : Rohit Sharma ची विकेट खरंतर स्टार्कची होती, पण कॅप्टन स्मिथमुळे असं नाही घडू शकलं

IND vs AUS 3rd Test : खरंतर रोहित शर्माची विकेट मिचेल स्टार्कची होती. पण कॅप्टन स्टीव्ह स्मिथमुळे ही विकेट कुहनेमनच्या खात्यात जमा झाली.

IND vs AUS Test : Rohit Sharma ची विकेट खरंतर स्टार्कची होती, पण कॅप्टन स्मिथमुळे असं नाही घडू शकलं
Rohit sharmaImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 11:44 AM

IND vs AUS 3rd Test : समोर मिचेल स्टार्क असेल, तर रोहित शर्मा खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी थोडा वेळ घेतो. इंदोर कसोटीत पुन्हा एकदा हीच गोष्ट दिसून आली. नियमित कॅप्टन पॅट कमिन्सच्या जागी मिचेल स्टार्क आज मैदानात उतरला. त्याची गोलंदाजी खेळण्यासाठी रोहित शर्मा स्ट्राइक घेतला. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये नाटय भरलेले होते. पहिल्या ओव्हरच्या 4 बॉलमध्येच थरार दिसून आला. त्यावरुन ही कसोटी रंगतदार होणार, हा अंदाज बांधला जातोय. इंदोर कसोटीत पहिल्याच ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा उचलला फक्त 1 टेस्ट मॅच खेळण्याचा अनुभव असलेल्या मॅथ्यू कुहनेमनने. पॅट कमिन्स नसल्याने त्याच्याजागी स्टीव्ह स्मिथ या कसोटीत टीमच नेतृत्व करतोय. त्याने सहाव्या ओव्हरमध्ये ग्रीनच्या जागी कुहनेमनला गोलंदाजीला आणलं. कुहनेमनने ओव्हरमधील अखेरच्या 6 व्या चेंडूवर रोहितची विकेट काढली.

स्टार्कने दबाव टाकला

कुहनेमनने रोहितची विकेट काढली. पण त्याआधी मिचेल स्टार्कने दबाव निर्माण केला. रोहित शर्मा 23 चेंडूत 12 रन्स करुन आऊट झाला. या दरम्यान त्याला दोनवेळा जीवनदान मिळालं. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच ओव्हरमध्ये जीवनदान मिळालं.

रोहित शर्मा vs मिचेल स्टार्क

रोहित शर्माला पहिल्याच चेंडूवर जीवनदान मिळालं. स्र्टार्कसह संपूर्ण टीमने अपील केलं होतं. पण अंपायरने अनुकूलता दाखवली नाही. ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह स्मिथने DRS घेण्याची हिम्मत दाखवली नाही. परिणामी रोहित शर्मा बाद होण्यापासून वाचला. व्हिडिओ रिप्लेमध्ये रोहित बाद झाल्याच दिसत होतं.

रोहित शर्मा कसा OUT झाला ते या व्हिडिओमध्ये बघा

चौथ्या चेंडूवर पुन्हा अपील

ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा रोहित विरोधात जोरदार अपील झालं. यावेळी ऑस्ट्रेलियाने DRS घेतला असतं, तर रोहित LBW आऊट झाला असता. पण स्मिथने पुन्हा एकदा DRS घेतला नाही. रोहितला स्र्टार्कच्या ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा जीवनदान मिळालं. त्यानंतर 5 व्या चेंडूवर रोहितने चौकार मारला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला

स्टार्कच्या ओव्हरनंतर रोहितच्या चेहऱ्यावर दबाव स्पष्ट दिसत होता. अशावेळी स्मिथने फिरकी गोलंदाजांना आणलं. त्याची ही चाल यशस्वी ठरली. त्याच्या गोलंदाजीवर रोहितने पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या पट्टयात आला नाही. विकेटकीपर कॅरीने रोहितच स्टम्पिग करण्यात कुठलीही चूक केली नाही. सहाव्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाला पहिला झटका बसला. रोहितने 3 चौाकार मारताना 12 धावा केल्या.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.