AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs aus | 6,6,6,6,6 : राजकोटमध्ये रोहित शर्माचं वादळ, हिटमॅनने सिक्सर्चा पाऊस पाडत रचला इतिहास, पाहा Video

ROhit Sharma Sixers : रोहित शर्माचं राजकोटमध्ये वादळ आलेलं दिसलं, कारण पठ्ठ्याने आल्यापासूनच कांगारूंच्या बॉलर्सचा घाम काढला. रोहितने आपल्या खेळीमध्ये सिक्सर्सचा पाऊस पाडला.

ind vs aus | 6,6,6,6,6 : राजकोटमध्ये रोहित शर्माचं वादळ, हिटमॅनने सिक्सर्चा पाऊस पाडत रचला इतिहास, पाहा Video
| Updated on: Sep 27, 2023 | 8:05 PM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताची आता बॅटींग सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारताला 353 धावांचं आव्हान दिलं आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात एकदम झकास झालीये. कर्णधार रोहित शर्मान तोडफोड फलंदाजी करत एक आक्रमक सुरूवात करून दिली आहे. रोहितने कांगारूंच्या एकाही बॉलरला सोडलं नाही. तोडफोड बॅटींग करत त्याने आपलं 53 वं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

पाहा व्हिडीओ:-

रोहित शर्मा याने अवघ्या 31 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या असून यामध्ये त्याने 5 सिक्सर आणि 3 चौकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. रोहितसह आज बॅटींगल वॉशिंग्टन सुंदर उतरला होता. सुंदरला काही जास्त संधीचा फायदा घेता आला नाही. वॉशिंग्टन 18 धावा करून मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

रोहितने रचला इतिहास

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्यापासून रोहित फक्त तीन सिक्स दूर आहे. रोहितने आजच्या सामन्यात सहा सिक्स मारत करिअरमधील ५५० सिक्स पूर्ण केले आहेत. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर ख्रिस गेल असून त्याचे ५५३ सिक्स आहेत.

रोहित शर्मा आज  शतक मारणार असं वाटत होतं. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात  तो कॅच आऊट झाला. मॅक्सवेलने त्याच्याच गोलंदाजीवर  रोहितचा झकास झेल घेतला, रोहितने मारलेला चेंडू वाऱ्याच्या वेगाने जात होता, मॅक्सवेलने हात घातला आणि चेंडूही त्याच्या हातात बसला. चुकून थोडा जरी टाइमिंग चुकला असता तर मॅक्सवेलला बॉल लागला असता.

दरम्यान, रोहित शर्माने अवघ्या ५७ धावांमध्ये 81 धावा केल्या, यामध्ये त्याने सहा सिक्सर आणि पाच चौकार मारले. रोहित शर्मा बाद झाला असून आता विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानात आहेत.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (w), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (c), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्धा कृष्णा

शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.