AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : टीम इंडियाची पाचव्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन फिक्स! 11 खेळाडूंमध्ये कोण कोण?

Australia vs India 5th Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते? जाणून घ्या.

AUS vs IND : टीम इंडियाची पाचव्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन फिक्स! 11 खेळाडूंमध्ये कोण कोण?
jasprit bumrah virat kohli team india testImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jan 02, 2025 | 6:29 PM
Share

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. पाचव्या सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा हा पाचव्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. नववर्षातील पहिल्या आणि मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी कुणाला संधी मिळू शकते? हे आपण जाणून घेऊयात.

रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधार या नात्याने यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहला पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच रोहितच्या जागी शुबमन गिल याचं कमबॅक होऊ शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा रोहितच्या जागी केएल राहुल हा यशस्वी जयस्वाल याच्यासह ओपनिंगला येणार असल्याची चर्चा आहे. तसेच आकाश दीप याच्या जागी प्रसिध कृष्णा याचं कमबॅक होऊ शकतं. त्यामुळे पाचव्या सामन्यासाठी टीम इंडियात 2 बदलांसह प्लेइंग ईलेव्हन निश्चित झाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

बुमराह पुन्हा विजयी करणार?

रोहित शर्मा या मालिकेतील पहिल्या कसोटीत दुसऱ्या अपत्याच्या जन्मामुळे उपस्थित नव्हता. तेव्हा जसप्रीत बुमराहने टीम इंडियाचं नेतृत्व केलं आणि विजयी सलामी करुन दिली. आता टीम इंडिया या मालिकेत 4 सामन्यांनंतर 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी करण्यासाठी बुमराहसमोर टीम इंडियाला विजयी करण्याचं आव्हान असणार आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाने एक बदल केला आहे. ऑलराउंडर मिचेल मार्श याच्या जागी अनकॅप्ड ब्यू वेब्स्टर याचा समावेश केला आहे.

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज.

पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.