AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs aus : …तर सामना न होताच ऑस्ट्रेलिया जाणार फायनलमध्ये! टीम इंडिसासाठी वाईट बातमी!

सामन्याच्या वेळेत जर पाऊस आला तर याचा फटका भारतीय संघाला बसणार आहे. जर पाऊस चालूच राहिला तर काय आहेत नियम जाणून घ्या.

ind vs aus : ...तर सामना न होताच ऑस्ट्रेलिया जाणार फायनलमध्ये! टीम इंडिसासाठी वाईट बातमी!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 23, 2023 | 5:45 PM
Share

मुंबई : महिला टी-२० वर्ल्ड कपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील सेमी फायनल सामन्याला काही तासांचा अवधी बाकी आहे. सामन्याआधी भारतीय संघाला धक्के बसले यातील एक म्हणजे कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पुजा वस्त्राकर यांच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. दुसरी मोठी गोष्टी म्हणजे सामन्याच्या वेळेत जर पाऊस आला तर याचा फटका भारतीय संघाला बसणार आहे. जर पाऊस चालूच राहिला तर काय आहेत नियम जाणून घ्या.

सेमी फायनल सामन्यामध्ये पाऊस पडला तर निकालासाठी काही षटकांची गोलंदाजी करण्याची गरज नाही. कारण आयसीसीने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी 1 राखीव दिवस ठेवला आहे. पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे 23 फेब्रुवारीला सामना होऊ शकला नाही तर दुसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारीला सामना जशा स्थितीत होता तसा पुढच्या दिवशी सुरू केला जाईल.

राखीव दिवशीही सामन्याचा काही निकाल नाही आला. नाणेफेक न करता किंवा एकही षटक न खेळता पावसामुळे सामना रद्द झाला, तर ग्रुप स्टेजमधील सामन्यांमधील गुणांच्या आधारे जो संघ टॉपवर असणार त्याला विजयी घोषित करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अ गटात पहिल्या क्रमांकावर आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशीही पाऊल आलाच तर ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

दोन्ही संघांमधील आकेडवारी पाहिली तर त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. आतापर्यंत 30 T-20 सामने झाले आहेत. यात 30 पैकी 22 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. यातील 5 सामने वर्ल्डकपमध्ये झाले असून 3 मध्ये ऑस्ट्रेलिय़ाने विजय मिळवला आहे. तर भारताने दोन सामने जिंकलेत.

पहिली सेमी फायनल आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तर उद्या दक्षिण आफ्रिका इंग्लंडमध्ये दुसरी सेमी फायनल होणार आहे. क्रीडा जाणकारांचं म्हणणं आहे की भारताने आजचा सामना जिंकला तर फायनलला कोणताही संघ वरचढ ठरणार नाही. त्यामुळे आज हरमनप्रीत कौर आणि कंपनीला ऑस्ट्रेलियन संघाला हरवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

भारतीय संघ-  हरमनप्रीत कौर (कर्णधार), हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य,  पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे

Follow Us
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात